Headlines

Sanjay Dutt : ‘आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं’, नर्गिस यांची कॅन्सरशी झुंज, संजय दत्तनं सांगितला कठीण काळ


Sanjay Dutt : संजय दत्तनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे.

Sanjay Dutt On Nargis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – संजय दत्त हा बॉलिवूडचा सुपरस्टार असून तो त्याच्या पहिल्या ‘रॉकी’ या सिनेमाचं शुटिंग करत असताना त्याची आई नर्गिस, कॅन्सरशी झुंज देत होत्या. नर्गिस कोमामध्ये गेल्या तेव्हा संजयला त्याचे वडील सुनील दत्त यांनी चित्रपट पूर्ण करण्यासाठी पाठवलं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये संजय दत्तनं या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

संजय दत्तनं सांगितला कठीण काळ

एआयजी हॉस्पिटल्सच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला की, ‘दुर्दैवानं, माझ्या आईचं स्वादुपिंडाच्या (पॅनक्रियाटिक) कॅन्सरमुळे निधन झालं. ही घटना ८० च्या दशकाच्या सुरुवातीची आहे. आज आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे, ते तेव्हा अस्तित्वात नव्हतं. ती एक मोठी शस्त्रक्रिया होती. आम्ही न्यूयॉर्कला गेलो आणि स्लोन केटरिंगमध्ये शस्त्रक्रिया करून घेतली.

Sanjay Dutt च्या टायगरफायर लॉंचला बॉलिवूड स्टार्सची स्टायलिश एन्ट्री

संजय दत्तनं सांगितलं की, नर्गिस यांच्या आजारपणाचा त्यांच्या कुटुंबावर खूप खोलवर परिणाम झाला होता. जेव्हा त्यानं आपल्या आईला या आजाराशी झुंजताना पाहिलं, तेव्हा तो फक्त १९ किंवा २० वर्षांचा होता. संजय म्हणाला, ‘तिला खूप त्रास होता. मी तेव्हा खूप लहान होतो, साधारण १९ किंवा २० वर्षांचा. माझ्या आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं. आम्ही प्लेटलेट्स दान केल्या, जे काही शक्य होतं ते सर्व केलं. माझ्या बहिणी माझ्यापेक्षा लहान होत्या. तो खूप कठीण काळ होता.’
Maharashtra TimesNaseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी
‘आईवर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, त्याचदरम्यान माझा ‘रॉकी’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार होता. आई कोमात असताना माझ्या वडिलांनी मला सिनेमा पूर्ण करण्यासाठी भारतात पाठवलं. त्या वेळी मला त्यांचा निर्णय अजिबात समजला नव्हता. आई कोमात असताना चित्रपट महत्त्वाचा कसा असू शकतो? असा प्रश्न मला पडला होता. पण, मी त्यांचं ऐकलं आणि काम पूर्ण करून न्यूयॉर्कला गेलो.’
Maharashtra TimesPrajakta Kulkarni : ‘माझ्यावर खूप प्रेशर होतं’, ‘दामिनी’ सिनेमात अतिप्रसंगाचा सीन; प्राजक्ता कुलकर्णींनी सांगितला शुटिंगचा अनुभव
नर्गिस यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण सांगताना संजय म्हणाला की, ‘मी तिला लढताना पाहिलं. मला वाटतं की तिला कसंही करून घरी यायचं होतं. ती परत येईपर्यंत लढत होती. घरी पोहोचल्यानंतरच तिनं जगण्यासाठीचा संघर्ष थांबवला आणि तिचं निधन झालं.’

वडील सुनील दत्त यांच्याबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला की, ‘ते एक कडक स्वभावाचे होते. मोठ्यांचा आदर करणं, डॉक्टरांचा सन्मान करणं हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा