Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातून एक थरारक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजाऱ्यांमधील किरकोळ वादाचं रुपांतर थेट खुनात झालं आहे.
कुपवाड पत्नी पतीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या कुपवाडमध्ये 15 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनी हल्ल्याने आता गंभीर वळण घेतलं आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोहन केसरेकर यांचा मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी त्यांची पत्नी मनीषा केसरेकर यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणात आता डबल मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
कुपवाडपरिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळी कचरा टाकण्यावरुन किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख याने मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. फरीदने मोहन यांच्या डोक्यात हातोडीने गंभीर वार केले. पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मनीषा यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मोहन यांच्यावर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या फरीद अब्दुल शेखला पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेतलं. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि एपीआय प्रशांत निशानदार यांच्या पथकानं ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामधील शेवरे दिगर येथे पार पडलेल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत वाद निर्माण होऊन ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रल्हाद पाटील (वय 54, रा. ओम नगर, पारोळा) असं मृत ग्रामसेवकाचं नाव आहे.
कामांच्या जुन्या बिलावरून वाद
शेवरे दिगर येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला गावातील तरुण मंडळींसह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सभा सुरू असताना जुन्या कामांच्या बिलावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादातून प्रचंड मानसिक धक्का बसल्यानं अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ग्रामसेवक पाटील हे सभेतून निघून आपल्या घरी गेले.
तब्बेत खालावल्याने त्यांना तत्काळ पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात नेलं जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचीप्राणज्योत मालवली. ही घटना काल सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा