Headlines

Sana Khan : प्रामाणिकपणाचं युग संपलं, स्वतःची कबर खणायला घ्या; सना खानची बुचकळ्यात पाडणारी पोस्ट


Sana Khan Video : अभिनेत्री सना खाननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, प्रामाणिकपणाचं युग संपलं, कुणीही तुम्हाला लक्षात ठेवणार नाही, स्वतःची कबर स्वतः खणायला घ्या, असं म्हटलं आहे.

Sana Khan On Life And Honesty
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री सना खाननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून अभिनेत्रीच्या या व्हिडिओमुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

सना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणतेय की, ‘शेवटी, मुलं नातेवाईक आणि मित्र कोणीही उपयोगी पडणार नाही. कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही किंवा कोणीही कुराण पठण करून तुमच्या कर्मांसाठी तुम्हाला माफ करणार नाही.’

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

सना खानची पोस्ट

सना खान व्हिडिओमध्ये म्हणतेय की, ‘तुम्हाला खरंच वाटतं का? की तुमच्या मृत्यूनंतर, तुमची मुलं, तुमचे नातेवाईक, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र… तुमच्यासाठी कुराण पठण करून तुम्हाला माफ करतील? ही मुलं, जी तुम्ही सांगितल्यावर प्रार्थनासुद्धा करत नाहीत, तुमच्यासाठी प्रार्थना करतील का? हे नातेवाईक, तुमच्यासाठी प्रार्थना करतील का? हे मित्र, ज्यांच्यासोबत इतर चर्चा केल्यास तुमची चेष्टा करतात, ते तुमच्यासाठी सूरह फातिहा वाचतील का? हे भाऊ-बहीण, जे ईदच्या दिवशीही तुमची आठवण काढत नाहीत, ते तुमच्यासाठी दानधर्म करतील का?’

‘स्वतःची कबर खणायला घ्या’

‘निष्पाप लोकांनो, प्रामाणिकपणाचं युग संपलंय. प्रलय जवळ येत आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. तुमची स्वतःची कबर खणायला घ्या. इथे लोक जिवंत लोकांनाच विसरतात, तर मृत्यूनंतर काय लक्षात ठेवणार? प्रत्येकजण विसरतो. तुमच्या स्वतःच्या कबरीची, तुमच्या स्वतःच्या मृत्यूनंतरच्या आयुष्याची तयारी करा. आजच सुरुवात करा.’ सना खानच्या या व्हिडिओमुळे चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.
Maharashtra TimesAnuj Prabhu : ‘खूप नर्व्हस होतो, राज ठाकरे आणि आनंद दिघेंचं राजकारणाव्यतिरिक्त नातं दाखवायचं होतं’, अनुज प्रभूनं सांगितला ‘धर्मवीर’ सिनेमाचा किस्सा
दरम्यान, सना खाननं २०२० मध्ये चित्रपट आणि इंडस्ट्री सोडली. नंतर २०२० मध्ये, सनानं मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी लग्न केलं. सनानं सांगितलेलं की, अनसशी लग्न करण्याचा तिचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नव्हता, तर अनसला ती अनेक वर्षांपासून आवडत होती. त्यानंतर अनस सय्यदनं एका धर्मगुरूच्या माध्यमातून तिला लग्नाची मागणी घातली. आज, सना खानचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि ती दोन मुलांची आई आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा