मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनेत्री सई ताम्हणकर ही केवळ भूमिकांच्या निवडीमुळेच नव्हे, तर सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडण्यासाठीही ओळखली जाते. चित्रपटसृष्टीतील मानधनातील विषमता आणि समान वेतनाच्या चर्चेवर बोलताना सईनं पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका मांडली आहे. कलाकाराचं मानधन हे ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष यावर नव्हे, तर त्या कलाकारानं प्रकल्पात दिलेल्या योगदानावर ठरायला हवं, असं ती मानते.
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आज ती अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे स्वतःच्या हक्काच्या मानधनाची मागणी आत्मविश्वासानं करू शकते. याबाबत सई म्हणाली, ‘मी आज अशा टप्प्यावर आहे की, माझ्या हक्काच्या मानधनाची मागणी करू शकते. मला माझं मूल्य माहीत आहे. तसंच निर्मात्यांनाही विश्वास असतो, की मी एखाद्या कलाकृतीसाठी चित्रीकरणापासून प्रदर्शनापर्यंत आणि त्यानंतरही शंभर टक्के योगदान देईन. ही प्रतिमा तयार करायला वेळ लागला, पण ते अशक्य नाही.’
Kangana Ranaut on Gen Z:’जनरेशन गटार’; मद्यपान, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध; कंगना रणौतची जेन झी तरुणींवर तिखट शब्दांत टीका मानधनाच्या बाबतीत बोलणी करताना; नवोदित कलाकारांना अनेकदा काम गमावण्याची भीती वाटते. या पार्श्वभूमीवर तिनं सांगितलं, ‘मी स्वतः त्या टप्प्यातून गेले आहे आणि ती भावना मी समजू शकते. मात्र, हे शक्य आहे यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागते, पण त्याचवेळी तुमची किंमतही माहिती असायला हवी. आज मी माझ्या योग्य मानधनाची मागणी करते, तेव्हा इतर कलाकारांसाठीही त्याचे दरवाजे उघडतात. एखादा कलाकार त्याच्या योग्यतेनुसार मानधन मागत असेल, तर निर्मात्यांनी त्याकडे आश्चर्यानं पाहू नये.’
सई ताम्हणकर नाटकाविषयी इच्छा व्यक्त करताच दिग्दर्शकांची मजेशीर प्रतिक्रिया, तरुण अन् …
दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गेली तीन वर्षे ती सातत्यानं एकामागे एक प्रोजेक्ट करताना दिसतेय. मराठी, बॉलिवूड ,ओटीटी अशा क्षेत्रात तिचे बरेच प्रोजेक्ट रिलीज झाले. तिच्या अभिनयाचं कौतुकही होताना दिसतंय. तिनं आता बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण केलीय. बॉलिवूडमध्ये ‘मिमी’ चित्रपटासाठी फिल्मफेअर जिंकल्यानंतर सईनं ‘भक्षक’ आणि ‘अग्नी’ यांसारख्या मोठ्या पटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून आपलं स्थान पक्कं केलं.तसंच नवोदित दिग्दर्शकांसोबत प्रयोगशील काम करण्याची तिची तयारी तिच्या काही चित्रपटातून दिसून आली.
काही महिन्यांपूर्वी ती ‘तुंबाडची मंजुळा’ या सिनेमात हटके भूमिकेत दिसली होती. तर आता तिचा बोल बोल राणी हा क्राइम थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झालाय. तसंच मटका किंग या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेचीही चर्चा झाली.
एकीकडे सई सिनेमे, वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका सांभाळत असताना दुसरीकडे ती टीव्हीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाची भूमिका सांभाळतानाही दिसते.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा