Rohit Sharma : इंग्लंडला रोहित शर्मा फोडत होता, पण बॅट टीमबाहेर असलेल्या खेळाडूची होती; नेमकी कोणाची? – shardul thakur had given rohit the bat with which he scored a century against england at lords
Rohit Sharma : इंग्लंडला रोहित शर्मा फोडत होता, पण बॅट टीमबाहेर असलेल्या खेळाडूची होती; नेमकी कोणाची? – shardul thakur had given rohit the bat with which he scored a century against england at lords
Rohit Sharma News : इंग्लंडविरूद्ध रोहित शर्मा याने १३८ धावांची तुफानी खेळी केली. रोहितने १७ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. रोहितने यावेळी बॅटिंग करताना जी बॅट वापरली होती ती त्याला टीमबाहेर असलेल्या खेळाडूने दिली होती. नेमकी कोणी, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्माने शतक आणि शुभमन गिल, विराट कोहली यांनी अर्धशतक ठोकले खरे; पण ते भारताच्या विजयासाठी पुरेसे ठरले नाही. इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारतावर २७धावांनी मात केली. यासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. भारत हरला पण रोहित शर्मा याच्या शतकाने सर्व चाहते खूष झाले. सर्वांना हिटमॅनचा शो पाहायला मिळाला. पण तुम्हाला माहिती का या सामन्यामध्ये रोहित शर्माने वापरलेली बॅट त्याची नव्हती. ही बॅट त्याला टीमबाहेर असलेल्या खेळाडूने दिली होती. नेमका कोण होता तो खेळाडू? ज्याने रोहितला बॅट दिली जाणून घ्या.
रोहित शर्मा याने शतक केल्यावर त्यावेळी त्याने बॅट उंचावल्यावर बॅटच्या बॉटमला एका खेळाडूचे नाव लिहिल होते. हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या खेळाडूचे नसून शार्दुल ठाकूरचे होते. रोहितने शतक केले त्यावेळी शार्दुल कॉमेट्री करत होता. तो म्हणाला, मला भारतीय संघापासून मला कोणी दूर ठेऊ शकत नाही. शार्दुलने सांगितले की, माझे SS या कंपनीसोबत करार असून त्याचे मालक जतिन सरीन यांनी मला विलो लाकडाच्या बॅट पाठवल्या होत्या. रोहितला बॅट खूप आवडल्या त्याने मला एक बॅट मागितली. रोहितवर सगळेच प्रेम करतात त्यामुळे त्याला नकार द्यायचा प्रश्नच नाही, मला आनंद होतोय की, लॉर्ड्स सारख्या मैदानावर मी दिलेल्या बॅटने ऐतिहासिक शतक ठोकले, असं शार्दुल ठाकूर म्हणाला. FIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर बेन डकेटचे शतक आणि जेकब बेथेल, जो रूटच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३८७ अशी विक्रमी धावसंख्या रचली. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ७ बाद ३६० धावाच करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित-गिलने २४.२ षटकांत १४७ धावांची भागीदारी रचली. गिलने ८४ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ७७ धावा केल्या. यानंतर रोहितने विराट कोहलीच्या साथीने ८६ चेंडूंत ११३ वाढवला. धावा जोडून वेग रोहितने ११० चेंडूंत १७ चौकार व पाच षटकारांसह १३८ धावा केल्या. मात्र, ही जोडी फुटली आणि ईशान किशन, श्रेयस अय्यर झटपट माघारी परतले. त्यामुळे चेंडू आणि धावांतील अंतर वाढत गेले. कोहलीही बाद झाल्याने भारताच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. कोहलीने ६० चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह ७४ धावा केल्या. FIFA WC 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार स्पेशल ‘चॅम्पियनशिप रिंग’, चाहत्यांनाही तब्बल 1996 रिंग्स भेटणार, जाणून घ्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फॉर्मात असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजांची अनुभवाची कमतरता जाणवली. बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी ३०.१ षटकांत १९२ धावांची सलामी दिली. बेथेलला शतकापासून रोखण्यात प्रसिध कृष्णाला यश आले. डकेटने १३५ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह १४१ धावा केल्या. यानंतर रूटने ४८ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ७४, तर बटलरने १३ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा