Headlines

Rohit Sharma Retirement denied by BCCI secretary Devajit Saikia Lords ODI will not be last; हुश्श! लॉर्ड्सवर रोहितचा अखेरचा वनडे सामना नसेल, बीसीसीआय सचिवांनी चर्चा फेटाळल्या, वर्ल्डकपमधील सहभागावर काय म्हणाले?


Devajit Saikia on Rohit Sharma Retirement : लॉर्ड्सवर रविवारी होणारा सामना रोहित शर्माच्या कारकिर्दीतील अखेरचा असेल, अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिले आहे.

Devjit Saikia BCCI Cricket Rohit Sharma Retirement Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सोशल मीडियावर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चा बीसीसीआयने फेटाळून लावल्या आहेत. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध होणारा भारताचा तिसरा वनडे सामना हा रोहितचा या फॉरमॅटमधला अखेरचा सामना नसेल, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिले आहे.

बीसीसीआयने वृत्त फेटाळलं

“रोहित शर्माच्या भविष्याबाबत माध्यमांमध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मला ठामपणे सांगायचे आहे की, लॉर्ड्सवर रविवारी होणारा सामना रोहित शर्मा याच्या कारकिर्दीतील अखेरचा असेल, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. रोहित हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. जोपर्यंत तो संघाच्या धोरणांचा भाग असेल, तोपर्यंत तो देशाचे प्रतिनिधित्व करत राहील. थोडक्यात सांगायचे तर, लॉर्ड्सवरील वनडे हा त्याचा शेवटचा सामना नसेल.”

२०२७ च्या आयसीसी पुरुष वनडे क्रिकेट वर्ल्डकपचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे युवा खेळाडूंना संधी देण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे वृत्त येत असतानाच बीसीसीआयची प्रतिक्रिया आली आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चाळिशीकडे झुकलेल्या रोहितच्या भविष्याबाबत जोरदार चर्चा रंगत होती.
Maharashtra TimesRohit Sharma Retirement : रिटायरमेंटच्या चर्चांमुळे रोहित इंग्लंडविरुद्ध दबावात खेळतोय? टीम इंडियाचे बॅटिंग कोच नेमकं काय म्हणाले?

वनडे वर्ल्ड कपमधील सहभागावर प्रश्नच

रोहितच्या निवृत्तीबाबतचे वृत्त असत्य असल्याचे सैकिया यांनी ठामपणे सांगितले, मात्र २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित खेळेल की नाही, याबद्दल त्यांनी कोणतेही ठोस वक्तव्य केलेले नाही.

यशस्वी जैस्वालला संधीचे प्रयत्न

इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडिया मॅनेजमेंटच्या प्लॅनमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा समावेश नसल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आले. त्याऐवजी वनडे टीममध्ये संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या यशस्वी जैस्वालला दीर्घकाळ खेळण्याची संधी मॅनेजमेंटला द्यायची होती.

Gunratan Sadavarte | शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध? थेटच बोलले

“इंग्लंड दौऱ्यानंतरच्या प्लॅनमध्ये रोहितचा समावेश नाही, अशी माहिती सिलेक्शन कमिटीने त्याला दिली आहे” असे ‘इंडियन एक्सप्रेस’ने बीसीसीआयमधील एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले होते. “विशेषतः आपल्या फिटनेसवर काम केल्यानंतर रोहितला खेळणे सुरु ठेवायचे होते. मात्र आता निवड समितीने अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी रोहित शर्मावरच सोपवली आहे.”

‘रोहित मानसिक दबावाखाली’

भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी गेल्या वनडे सामन्यातील रोहितच्या फलंदाजीवर भाष्य करताना म्हटले की, त्यांना रोहित मानसिक दडपणाखाली असल्याचे जाणवत होते. “मानसिक पातळीवर त्याच्या विचारांमध्ये स्पष्टतेचा अभाव होता, असे मला वाटले ” असे दासगुप्ता यांनी थेट प्रक्षेपणादरम्यान सांगितले. “विचारांमधील स्पष्टता हे रोहितच्या बॅटिंगचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे, पण मला अशी जाणीव झाली की त्याला फलंदाजीचा वेग वाढवायचा होता, पण त्याला ते जमलं नाही. सलग नऊ डॉट बॉल्स गेल्यामुळे तो काहीसा दडपणाखाली आला आणि त्यानंतर त्याच्या गेममध्ये ती स्पष्टता दिसून आली नाही.”
Maharashtra TimesManjot Kalra Arrest : शुभमन गिलबरोबर मैदान गाजवणाऱ्या फलंदाजाविरुद्ध तीन खेळाडूंची तक्रार, श्रीलंकन पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय?
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. जर तो तिसऱ्या वनडे सामन्यात अपयशी ठरला, तर सिलेक्टर्स त्याला संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घेऊ शकतात. अशा वेळी त्याने निवृत्ती घेतली आहे की नाही, याला काहीच महत्त्व उरणार नाही.