Headlines

RERA Act on Home Layout Changes; फ्लॅट बुकिंगनंतर डेव्हलपर अचानक हवे तसे बदल करू शकतो का? खरेदीदारांना हरकत घेण्याचा अधिकार, RERA ॲक्ट समजून घ्या


Property Rules: आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णयही असतो. बहुतेक लोक लेआउट, फ्लोअर प्लॅन, खोलीचा आकार, मोकळी जागा आणि उत्कृष्ट डिझाइन यांसारख्या वैशिष्ट्यांच्या आधारावर फ्लॅट किंवा अपार्टमेंट निवडतात, पण बुकिंगनंतर डेव्हलपरने लेआउट बदललं तर काय?

एखाद्या फ्लॅट किंवा घराच्या बुकिंगनंतर विकासकाने मालमत्तेच्या लेआउट किंवा डिझाइन बदलल्यास खरेदीदार परताव्याची मागणी करू शकतो का? आणि पूर्ण परतावा मिळू शकतो का?

Maharashtra TimesNew Stock Market Timings: सोमवारपासून मार्केटची वेळ वाढणार! आता 3.30 ऐवजी शेअर बाजार 3:40 वाजता बंद होणार; क्लोजिंग ऑक्शन सेशनचे नवीन नियम जाणून घ्या
या प्रकरणात MahaRERA ने सांगितले की, बुकिंग केल्यानंतर डेव्हलपरने प्रॉपर्टीच्या लेआउट किंवा डिझाइनमध्ये मोठे बदल केल्यास, ज्याचा परिणाम खरेदीदार आणि डेव्हलपर यांच्यातील करारावर होत असेल, तर अशा परिस्थितीत घर खरेदीदार परताव्याची मागणी करू शकतात.

प्रकरण नेमकं काय आहे?

राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारींनंतर हा प्रश्न निर्माण झाला. जुलै 2021 मध्ये खरेदीदारांनी मुंबईजवळ 2 कोटींपेक्षा जास्त किमतीचा बंगला बुक केलेला आणि जून 2023 मध्ये घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. पुढे बंगल्याच्या आराखडा, डिझाइन, बांधकाम क्षेत्रात आणि पार्किंगच्या जागेत केलेल्या बदलांसंदर्भात खरेदीदार आणि विकासकात वाद निर्माण झाला.

करारापूर्वीच या बदलांविषयी माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी विकासकाच्या सांगण्यावरूनच केल्याचा खरेदीदारांनी दावा केला. वाद वाढत गेल्याने खरेदीदारांनी ऑगस्ट 2022 मध्ये बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विकासकाने सुरुवातीला संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले पण, नंतर पैसे देण्यास विलंब केला आणि हप्त्यांमध्ये पैसे परत करण्याचा प्रस्ताव दिला.

Maharashtra TimesGold Silver Price August 2026: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोल्ड शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याचे दर भडकले, चांदीचेही भाव वाढलेमहारेराने काय म्हटले

या प्रकरणात महारेराने स्पष्ट केले की, बुकिंगनंतर मालमत्तेच्या डिझाइन किंवा लेआउटमध्ये मोठे बदल केल्यास काही प्रकरणांमध्ये खरेदीदार परताव्याची मागणी करू शकतात. तक्रारदारांना विकासकाला दिलेली संपूर्ण रक्कम (कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि सरकारी अधिकाऱ्यांना दिलेले इतर कायदेशीर शुल्क वगळून) व्याजासह परत मिळण्याचा हक्क असून होम बायर्सनी घर खरेदीपूर्वी RERA अंतर्गत आपले हक्क आणि प्रकल्पाची सर्व कागदपत्रे पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

लेआउट किंवा डिझाइनमधील बदलांबद्दल RERA नियम काय?

रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता सुधारणा घर खरेदीदारांचे संरक्षण करण्यासाठी RERA कायदा 2016 लागू केला गेलेला. याअंतर्गत बुकिंगनंतर विकासक प्रकल्पात मनमानीपणे मोठे बदल करू शकत नाही. अशा महत्त्वपूर्ण बदलांसाठी सामान्यतः खरेदीदाराच्या संमती अनिवार्य आहे. तसेच बुकिंगच्या वेळी खरेदीदारांना दिलेल्या आश्वासनानुसार मालमत्ता मिळणे सुनिश्चित करण्याचा या नियमांचा उद्देश आहे.

Maharashtra TimesRepo Rate संबंधित RBI ची भूमिका; ‘दर तोच राहणार कायम’ तज्ज्ञांचा अंदाज, येत्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून

घर खरेदीदार कधी परतावा मागू शकतो?

डिझाइन किंवा लेआउटमध्ये मोठे बदल: विकासकाने घराच्या आवश्यक वैशिष्ट्यांमध्ये मोठे बदल केल्यास खरेदीदार आक्षेप घेऊ शकतो.

मंजूर योजनेत बदल: आवश्यक परवानगीशिवाय मोठे बदल केल्यास खरेदीदार परतावा मागू शकतो.

खोटी माहिती: मालमत्ता ब्रोशर किंवा जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे लक्षणीयरीत्या वेगळी असेल, तर खरेदीदार RERA ची मदत घेऊ शकतो.

कराराचा भंग: विकासकाने केलेले बदल विक्री कराराच्या अटींच्या विरोधात असतील ,तर खरेदीदार कायदेशीर हक्कांचा वापर करू शकतो.

घराचा आराखडा किंवा डिझाइनमध्ये बदल झाल्यास काय करायचे?

विकासकाने प्रकल्पात काही मोठे बदल केले, तर खरेदीदारांनी बदल काळजीपूर्वक समजून घ्यावे आणि मालमत्तेवर होणाऱ्या परिणामाचा विचार करावा. तसेच विकासकाकडून त्या बदलांबाबत लेखी स्पष्टीकरण घ्यावे, मंजूर आराखड्यांशी तुलना करावी आणि आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला घ्यावा. याशिवाय घर खरेदीदारांनी RERA पोर्टलवर प्रकल्पाचा तपशील आणि मंजूरी देखील तपासावी.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत