Reason Behind Dipika Kakar Accepting Islam ; Dipika Kakar Islam Covert Reason : शोएबशी लग्न केले म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला हे साफ चूक, सहअभिनेत्रीने सांगितलं दीपिका कक्करचं धर्मांतराचं खरं कारण
Reason Behind Dipika Kakar Accepting Islam ; Dipika Kakar Islam Covert Reason : शोएबशी लग्न केले म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला हे साफ चूक, सहअभिनेत्रीने सांगितलं दीपिका कक्करचं धर्मांतराचं खरं कारण
Dipika Kakar Religious Conversion : अभिनेत्री दीपिका कक्कर हिने मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केल्याने त्याच्या अधिपत्याकडे येऊन मुस्मिम धर्म स्विकारला म्हणून लोक तिला ट्रोल करत होते. पण आता तिच्याच सहअभिनेत्रीने या मागचे खरे कारण सांगितले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरात पोहोचली. पुढे ती टीव्ही इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री बनली आणि आता ती एक लोकप्रिय यूट्युबरही आहे. सध्या ती आपला सर्व वेळ आपल्या मुलासाठी देत असली, तरीही आपल्या यूट्यूब व्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधते. आपल्या आयुष्यातील घडामोडी शेअर करते. दीपिकाने 2018 मध्ये तिचा सह-कलाकारशोएब इब्राहिमशी लग्न केले; त्यावेळी अशी जोरदार चर्चा होती की, लग्नासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वत:चे नाव बदलून फैजा असे ठेवले. मात्र, आता ‘ससुराल सिमर का’मध्ये दीपिकासोबत काम केलेल्या जयंती भाटिया यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचा दावा केला आहे.
अभिनेत्री जयंती भाटिया यांनी स्पष्ट केले आहे की, दीपिकाने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला नव्हता. अभिनेत्रीने सांगितले की, दीपिकाने धर्म परिवर्तन नक्कीच केले होते, परंतु हा निर्णय तिने शोएबशी लग्न करण्यासाठी नाही, तर मानसिक शांततेसाठी घेतला होता.
शोएबशी लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला का?
अभिनेत्री जयंतीने नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली होती, जयंती भाटिया यांनी सांगितले की ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या पहिल्या सीझनदरम्यान दीपिका आणि शोएब यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. त्या म्हणाल्या, “सर्वांनाच माहित आहे की दीपिका जे काही करते, त्यात ती स्वतःला पूर्णपणे झोकून देते. जेव्हा ती शोएबच्या प्रेमात पडली, तेव्हा तिने पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने हे नाते निभावण्याचा निर्णय घेतला होता.”
जयंती यांनी सांगितले की मालिका संपल्यानंतर दीपिकाने काही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर लग्न केले. पुढे, जेव्हा त्यांनी दीपिकाला तिच्या धर्मांतराबाबत विचारले, तेव्हा त्यांना त्यामागचे खरे कारण समजले. जयंती म्हणाल्या, “मी तिला विचारले होते की लग्नामुळे तिने धर्म बदलला आहे का? यावर तिने स्पष्टपणे ‘नाही’ असे सांगितले. त्या काळात ती तिच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यातून जात होती. तिने अजमेर शरीफला भेट दिली होती आणि तिथे तिला आतून असे वाटले की तिने हे पाऊल उचलले पाहिजे. तिने स्वतःच्या इच्छेने धर्मांतर केले; याचा लग्नाशी काहीही संबंध नव्हता. कदाचित त्या अनुभवातून तिला मानसिक बळ मिळाले असावे. त्या प्रार्थनेतून तिला शांती आणि धैर्य मिळाले, म्हणून तिने धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक निर्णय होता.”
दीपिकाला सामोरे जावे लागलेल्या ट्रोलिंगवर भाष्य
जयंती यांना सोशल मीडियावर दीपिकाला ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल विचारले गेले. लोकांचा समज झालाय की तिने स्वतःला पूर्णपणे पतीच्या धर्माच्या अधीन केले आहे. यावर अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले की हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. जेव्हा दीपिका शोएबच्या प्रेमात पडली, तेव्हा करिअरच्या बाबतीत ती शोएबपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत होती. जेव्हा दीपिकाला शोएबची गरज होती, तेव्हा तो तिचा सर्वात मोठा आधार बनला आणि जेव्हा शोएबला दीपिकाची गरज होती, तेव्हा ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज जेव्हा दीपिका आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहे, तेव्हा शोएब प्रत्येक टप्प्यावर तिला साथ देत आहे. त्याच वेळी, दीपिकाने शोएबच्या कुटुंबालाही आपले मानले आहे. जर याला समानता म्हणत नाहीत, तर मग कशाला म्हणायचे? केवळ धर्म बदलणे म्हणजे स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे नव्हे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा