RBI चा हा महत्वाचा नियम तुम्हाला माहिती आहे का? आता कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला कर्ज बुडवणे फारच महागात पडणार आहे. बँकेचे कर्ज बुडवणे आणि जप्त करण्यात आलेली मालमत्ता इतर कुणाला विकणे या दोन्ही गोष्टींमध्ये RBI आता अधिक कठोर झालेली दिसत आहे. त्यामुळे कर्जदारांना आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे.

RBI चे ‘ते’ महत्वाचे नियम आहेत तरी कोणते?
- जर बँकेने एखादी मालमत्ता जप्त केली असेल, तर बँकेला ती फक्त 7 वर्षांसाठीच ठेवता येईल. त्यानंतर ती मालमत्ता विकावी लागेल.
- बँकेने मालमत्ता विकण्यासाठी काढली तर घेण्यात येणारा लिलाव हा फक्त सार्वजनिक स्वरूपाचा असावा. एकंदरीत, जप्त मालमत्ता विकण्यासाठी बँकेला पब्लिक ऑक्शन करावे लागणार आहे.
- कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला त्याची मालमत्ता पूर्णपणे विसरावी लागणार आहे कारण त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना ही मालमत्ता पुन्हा खरेदी करता येणार नाही.
- बँकांना जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन किमान दोन स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांकडून करणे बंधनकारक आहे.
महागाईचा बॉम्ब फुटणार! सर्वसामान्यांच्या खिशाला युद्धाची झळ; सणासुदीच्या तोंडावर रोजच्या वापरातील वस्तू महागणार, पाहा यादीजगभरात अनेक लोकं आर्थिक गरजेसाठी बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना त्यांच्या मालकीच्या काही गोष्टी बँकांकडे गहाण ठेवली जातात. त्या गोष्टी जमीन, दुकान, घर, गाडी किंवा इतर कोणतीही मालमत्ता असू शकते. कर्ज बँकांना परत करण्याची एक ठराविक मुदत दिली जाते. जर कर्ज घेणारा या वेळेत कर्ज परत करण्यात असमर्थ ठरला. तर त्याने गहाण ठेवलेली मालमत्ता पूर्णपणे बँकेच्या मालकीची होते आणि त्या मालमत्तेला विकण्याचा पूर्ण अधिकार संबंधित बँकेकडे असतो.
RBI च्या नव्या नियमावलीनुसार, बँकेकडून जप्त करण्यात आलेली ती मालमत्ता बँकेला 7 वर्षांच्या आत विकावी लागेल. जप्त करण्यात आलेली मालमत्ता पुन्हा कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला विकली जाऊ शकत नाही. तसेच त्या व्यक्ती संबंधित असणाऱ्या लोकांनाही मालमत्ता विकण्यास मनाई आहे. या गोष्टींची खबरदारी बँकांना घ्यावी लागणार आहे. बँक जप्त करण्यात आलेली मालमत्ता खाजगी लिलावाद्वारे विकू शकत नाही. जप्त मालमत्ता फक्त पब्लिक ऑक्शनद्वारेच विकली गेली पाहिजे. RBI च्या या नव्या नियमांमुळे जप्त मालमत्ता विकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. तसेच कर्जवसुली करण्याची प्रक्रिया आणखीन शिस्तबद्ध झाली आहे.
RBI च्या या नियमांचा सामान्य माणसांवर परिणाम काय?
RBI च्या या नियमांमुळे सामान्य माणसांवर होणार परिणाम असा आहे की जर एखाद्या व्यक्तीचे कर्ज थकले तर निश्चितच मालमत्ता जप्त केली जाईल पण त्या मालमत्तेची विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शकतेने होईल. पण, कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला ती मालमत्ता पुन्हा विकत घेण्याची संधी मिळणार नाही.

