Headlines

Ratnagiri Amba Ghat Businessman Prathamesh Dalvi Beaten and Robbed; पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेली कार, व्यावसायिकाला घाटात पकडलं; कारमध्ये कोंबून आंबा घाटात मध्यरात्री थरारक दरोडा


Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रत्नागिरीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Ratnagiri Amba Ghat Robbery
रत्नागिरी आंबा घाट दरोडा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : पांडुरंग लिहिलेली थार गाडी व भारत सरकार असा लोगो असलेली इनोव्हा गाडी दोन्ही गाड्यांमधून पटापट काहीजण उतरले आणि एकाला गाडीत जबरदस्ती कोंबून घेऊन रोकड लुटल्याचा मोठा प्रकार घडला आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या आंबा घाटातील थरारक प्रकार काल बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे. मात्र, देवरुख पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासाची सूत्र हलवत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर आंबा घाटातील दख्खन येथे म्हैस घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाला अडवून, चाकूचा धाक दाखवत मारहाण आणि लूटमार करणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे काल रोजी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंग लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.
Maharashtra TimesAshok Kharat: खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार, काळ्या कारनाम्याचा भांडाफोड

दारू पिताना बसलेले दिसले

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम व त्यांच्यासोबत अवघ्या तीन पोलिसांच्या टीमने घाट परिसर पिंजून काढला. त्याचवेळेला एका आड वाटेला असलेल्या पांडुरंग कृपा वर्णनाची गाडी दिसली व त्याचठिकाणी हे सगळे संशयित आरोपी दारू पिताना बसलेले दिसले. अवघ्या तीन जणांच्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता कौशल्य पणाला लावत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील दोन जण पळून जाण्यास यशस्वी ठरले असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या पाच जणांना देवरुख न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाच जणांना तत्काळ अटक

या घटनेनंतर प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि लांजा पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फरहान रशिद मुल्ला (४२, रा. कोकण नगर), प्रथमेश सचिन भाटकर (२४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (२२, रा. सोमेश्वर), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६, रा. मिऱ्या) या पाच जणांना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.
Maharashtra TimesJalna Crime : आई गेल्यानं वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय, पोटच्या मुलाचा संताप; लग्नाच्याच दिवशी लेकरानं बापाला संपवलं

पोलीस दलाचं कौतुक

या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा