Raja Chaudhary : श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीबद्दल दावा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक आयुष्य वादांनी घेरलेलं होतं. अभिनेत्रीचे दोन घटस्फोट झाले आहेत. श्वेतानं १९९८ मध्ये राजा चौधरीसोबत पहिलं लग्न केलं. राजा चौधरीपासून श्वेताला पलक तिवारी नावाची मुलगी झाली. नऊ वर्षांनंतर श्वेता आणि राजा यांचं त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी, श्वेता तिवारीनं राजा चौधरीवर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. घटस्फोटानंतर तिनं आपली मुलगी पलक तिवारीचा ताबा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजा चौधरीनं श्वेताबद्दल धक्कादायक दावा केला आहे. लग्न झालेलं असतानाही अभिनेत्रीचं अफेअर होतं, असं त्यानं सांगितलं आहे.
‘श्वेता तिवारीचं सीझेन खानसोबत अफेअर असल्याचा तुम्ही आरोप केलेला’, असं विचारलं असता राजा चौधरी म्हणाला की, ‘सीझेन खान नाही, बऱ्याच जणांची नावं मी घेतली आहेत. तिचं अनेकांसोबत अफेअर होतं. ती त्याच्यासोबत काम करायची, त्याच्या घरी राहायची. आमच्या एका मैत्रिणीसमोरही तिनं कबुली दिलेली. सीझेन मला फोनवर म्हणालेला, ‘तुझ्यात हिंमत आहे तर माझ्या घरी ये. श्वेता तुझ्यासोबत कधीच नव्हती. पहिल्या दिवसापासून ती माझीच आहे. तू जसा आहेस तसा खुश राहा’ पण तिने माझ्यासमोर कधीच कबूल केलं नाही. ती म्हणायची, ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत”
‘मी श्वेता आणि सीझेनला रंगेहाथ पकडलेलं. श्वेताने मला सांगितलेलं, ती शुटिंगला जातेय. तिच्या गाडीत माझं सामान होतं, ते मला घ्यायचं होतं, म्हणून मी सेटवर गेलो. पण, ती तिथे नव्हती. एक तासाने श्वेता सीझेनच्या गाडीतून आली आणि त्या गाडीच्या मागून तिचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती मला म्हणाली, ‘मी डबिंगला आहे’ मी तिथे गेलो. पण तिथे कळलं आज डबिंग नाही. श्वेता सीझेनसोबत होती. अशा २-३ घटना घडल्या आहेत. तरीही ती कबूल करत नव्हती. ती कायमच खोटं बोलत आलीये.’ असं राजा चौधरीनं शेवटी सांगितलं. ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजा चौधरी बोलत होता.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा