Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील शिक्रापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा 26 जुलै रोजी दुपारी झाला. जेव्हा शिक्रापूर येथील करंजेनगरच्या एका मोकळ्या मैदानात, झुडपांमध्ये पोत्यात भरलेला एक अज्ञात तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत सोशल मीडिया आणि गुप्त सूत्रधारांच्या जाळ्याचा वापर केला. अखेर तो मृतदेह गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) या तरुणाचा असल्याचं निष्पन्न झालं.
Crime News : नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?
मुकेश आणि जान्हवी ताब्यात
पोलीस तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. मृत गौरव हा करंजेनगर येथे त्याचा मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्यासोबत रूममेट म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून कडाक्याचं वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच संशयाच्या धाग्यावरून पोलिसांनी तात्काळ मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी मृत गौरवच्या आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुकेश आणि जान्हवी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
ताथवडे येथे दहा वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी 61 वर्षीय व्यक्तीविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पॉक्सो, भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रमजान बन्नूसाब बागवान (वय 61, रा. ताथवडे) असे संशयिताचे नाव आहे.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; चिक्की, सोनपापडीचा लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित
या प्रकरणी 30 वर्षीय महिलेने सोमवारी (27 जुलै) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला दहा आणि चार वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यापैकी दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट फाडीन, अशी धमकी देऊन घरात कोणी नसताना तोंड दाबून संशयिताने स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर मे 2026 ते 27 जून 2026 या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. संशयित फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीलाही तोंड दाबून घेऊन जात असताना एका महिलेने पाहिले, तेव्हा हा प्रकार उघड झाला.

