Pune police action against bishnoi gang four accused arrested from five states; पुणे पोलिसांचा कथित बिश्नोई गँगला जबरदस्त दणका! तिघांना पंजाबमधून उचललं, पुण्यातून एक अटकेत
Pune police action against bishnoi gang four accused arrested from five states; पुणे पोलिसांचा कथित बिश्नोई गँगला जबरदस्त दणका! तिघांना पंजाबमधून उचललं, पुण्यातून एक अटकेत
कुलदीप जाधव, पुणे: पुण्यातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी धमकीचे कॉल करून गोळीबारातून दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित बिश्नोई गँगला पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. तब्बल पाच हजार किलोमीटरचा पाठलाग, हजार तासांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि पाच राज्यांत राबविलेल्या धडक मोहिमेनंतर या प्रकरणातील चार आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीचे कॉल आल्यानंतर शहरात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ सहा आणि गुन्हे शाखेची विशेष पथके तपासाला लागली. पुण्यापासून नाशिक, सुरत, अजमेर, भटिंडा, शिरसा आणि राजस्थानातील विविध भागांपर्यंत तपासाचे जाळे पसरवण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांत वरिष्ठ अधिकारी स्वतः तळ ठोकून आरोपींचा माग काढत होते.
तपासादरम्यान हजार तासांपेक्षा अधिक कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासातून २४ जून रोजी गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटरची ओळख पटली. त्यानंतर एका शूटरला अटक करण्यात आली. पुढील कारवाईत पंजाबमधील भटिंडा येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली. या कटात स्थानिक पातळीवर आरोपींना माहिती पुरविणाऱ्या आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक करण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणातील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी व्यावसायिकांना कोणत्याही धमक्यांना भीक न घालण्याचे आवाहन केले आहे. खंडणीसाठी दमबाजी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिस कायम सज्ज असल्याचा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कारवाईतील ठळक बाबी
– पाच राज्यांत राबविली धडक शोधमोहीम – सुमारे ५,००० किलोमीटरचा तपासाचा प्रवास – हजार तासांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी – चार आरोपी अटकेत; तीन पिस्तुले जप्त – आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई – गुन्हे शाखेच्या चार आणि परिमंडळ सहाच्या एका पथकाला प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा