Pune fda strict campaign against milk adulteration tukaram mundhe shifts focus to big companies; तुकाराम मुंढे आता थेट बड्या माशांभोवती फास आवळणार? रेड टाकली, रिपोर्ट येताच देणार दणका
Pune fda strict campaign against milk adulteration tukaram mundhe shifts focus to big companies; तुकाराम मुंढे आता थेट बड्या माशांभोवती फास आवळणार? रेड टाकली, रिपोर्ट येताच देणार दणका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन बड्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. यापूर्वी कारवाई झालेल्या दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र (चिलिंग सेंटर) किंवा संबंधित आस्थापनांकडून या कंपन्या दूध खरेदी करतात का, त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध आहे का, तसेच भेसळयुक्त दूध पुरवठ्याशी काही सबंध आहे का, याची पडताळणी करण्यासाठी तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एफडीए’च्या पथकाने दूध खरेदीच्या नोंदी, पुरवठादारांची माहिती, गुणवत्ता याबातची तपासणी केली. ही मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, त्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एफडीए आणि पोलिस प्रशासनाने रविवारी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांतील १३ आस्थापनांवर धाडी टाकून कारवाई केली होती. तपासात पाणी, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे (डेअरी परमिएट) पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट किंवा शाम्पू, पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले होते, असे ‘एफडीए’च्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले होते.
‘कात्रज’ डेअरीचीही सखोल चौकशी होणार
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करून, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येईल. चौकशीत बोगस दूध संस्था, आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेत आमदार सदाभाऊ खोत, बच्चू कडू आणि अरुण लाड यांनीही सहभाग घेतला. मंत्री सावे यांनी सांगितले, की ‘कात्रज डेअरीसंदर्भात दोन जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर दहा जूनला विभागीय उपनिबंधक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ११ जून रोजी सहायक निबंधक आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश केला जाईल.’
दूध भेसळीविरोधात मोहीम
राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ, कृत्रिम दूधनिर्मिती आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कठोर मोहीम हाती घेतली आहे. नव्या आदेशानुसार, कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी स्वतंत्र नियम लागू करण्यात आले असून प्रत्येक पात्रावर ‘कच्चे दूध’ असा स्पष्ट उल्लेख आणि “हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे” अशी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाश्चराइज्ड दूध हे केवळ सीलबंद, लेबलयुक्त आणि छेडछाड न होणाऱ्या पॅकेजिंगमध्येच विकता येणार आहे. तसेच दूध संकलनापासून अंतिम विक्रीपर्यंत संपूर्ण पडताळणी, शीतसाखळीचे पालन, योग्य अन्न प्रक्रिया उपकरणांचा वापर आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी राज्यव्यापी दूध पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकासाठी कठोर नियम लागू केले आहेत. या आदेशानुसार दूध संकलन केंद्रे, डेअऱ्या, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक तसेच घाऊक आणि किरकोळ विक्रेते यांना नव्या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा