Headlines

Pune FDA Raid :’एफडीए’ची कारवाई ; १२ हॉटेलचे परवाने निलंबित


Pune FDA Raid : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात हॉटेल ,औषध कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले. ‘एफडीए’विभागाने पुण्यात कारवाई सुरू केल्यानंतर त्या अंतर्गत १२ हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले.

Tukaram mundhe fda
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी ,पुणे: ‘‘एफडीए’च्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १८ ते २१ जुलैदरम्यान या भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरीच्या तपासण्या केल्या. त्या तपासणीत चुकीच्या गोष्टी आढळल्याने परवाने निलंबित करण्याबरोबर काही परवान्यांची नोंदणीही निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली,’ अशी माहिती सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिली.

१२ हॉटेलचे परवाने निलंबित

मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, मुदतबाह्य अन्न पदार्थांची साठवणूक तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन करणाऱ्या पुणे, चिंचवड, वडूज येथील हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आठवडाभरात केलेल्या तपासणीत १२ आस्थापनांना कारवाई करून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे. या कारवाईतून एफडीएने तीन लाख ४८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.

सातारा जिल्ह्यात एफडीए ची कारवाई सुरू

अन्न व औषध प्रशासनाच्या आय़ुक्तपदी तुकाराम मुंढेयांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर राज्यभरातील औषध कंपन्यांसह हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावर छापेसत्र सुरू झाले. त्यातून सामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे, या हेतूने मुंढे यांच्या कारवाईने राज्यातील हॉटेल चालकांपासून ते दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांचे; तसेच औषध कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याशिवाय आता छोट्या मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग पुण्यासह विभागातील सातारा जिल्ह्यात ‘एफडीए’च्या अन्न विभागाने कारवाई सुरू केली आहे.

Maharashtra TimesMumbai-Pune Railway: मुंबई-पुणे रेल्वेमार्गासाठी नवा प्रकल्प, कर्जत ते लोणावळादरम्यान आपत्कालीन रस्ता उभारणार; मध्य रेल्वेचा निर्णय

तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांकावर करा कॉल

कारवाई दरम्यान, तीन लाख ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधित पाच जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राहकांना अन्न पदार्थाचा दर्जा अथवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर १८००२२२३६५ नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आधी देखील ७ हॉटेलचे परवाने निलंबित

आपल्या धडाकेबाज कामाने ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासून कित्येक हॉटेल्स मधला स्वच्छतेचा अभाव , जेवण तयार करण्यात येणारी अस्वच्छ जागा या मुळे हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले. पुणे शहरासह जिल्ह्यातील१२ हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले
या आधीदेखील पुणे विभागात हॉटेल चालकांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली होती त्याअंतर्गत ७ हॉटेलचे परवाने निलंबित केले होते.स्वच्छतेचे निकष न पाळल्याने ‘एफडीए’ची कारवाई करण्यात आली.

Maharashtra TimesBMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?

एफडीए च्या हॉटेलला सूचना

. पिण्याचे पाणी मोफत द्यावे
. वेष्टन फुड ग्रेड दर्जाचे असावे
.विनापरवाना व्यवसाय करू नये
.वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर नको
. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नियम पाळावे
.मेन्यू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती नको

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा