Headlines

Pune Couple Divorce Husband Jailed for Share Bazar Loot Cheating Wife over Assistant Crime News; लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट


Pune Couple Divorce : शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत पतीची जवळीक वाढली. त्याने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने दुर्लक्ष करत तिचाच छळ सुरू केला.

Pune Couple Divorce Maharashtra Times (5)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली चाळीस ते पन्नास जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या पतीने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला संमती दिली अन् घरच्यांच्या विरोधाला न जुमानता बारा वर्षांपूर्वी दोघांनी केलेल्या प्रेमविवाहाचा अंत न्यायालयाच्या ‘डिजिटल स्क्रीन’वर झाला. जिल्हा न्यायाधीश महेंद्र जाधव यांच्या न्यायालयाने हा विवाह रद्द करून पत्नीच्या घटस्फोटाचा अर्जावर शिक्कामोर्तब केले.

या प्रकरणात पती (वय ३७) आणि पत्नीने (वय ३५) विशेष विवाह कायद्यांतर्गत २०१४ मध्ये प्रेमविवाह केला. या विवाहाला पतीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, त्याला न जुमानता दोघांनी संसार थाटला. सुरुवातीची वर्षे सुरळीत गेल्यानंतर पु पतीने नोकरी सोडून शेअर बाजाराचे मार्गदर्शन करणारे शिकवणी वर्ग सुरू केले.
Maharashtra TimesBetul Duggu Dog : मृत्यूही वेगळं करु शकला नाही; 15 वर्षांची साथ, मालकाच्या निधनाने डुग्गूही कावराबावरा; अंत्ययात्रेत चालतानाच श्वास थांबला, बाजूबाजूला अखेरचा निरोप

महिला कर्मचाऱ्याशी जवळीक

या काळात पतीच्या शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत त्याची जवळीक वाढली. पतीने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने दुर्लक्ष करून तिचा छळ सुरू केला. त्याने २०२४ मध्ये पत्नीला घराबाहेर हाकलून दिले.

पतीने शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल चाळीस ते पन्नास जणांना पाच ते सहा कोटी रुपयांना गंडा घातला. या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

पवारांची राष्ट्रवादी फुटणार? फडणवीस-जयंतरावांमध्ये खलबतं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब

पतीच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने त्याला नोटीस पाठवली. मात्र, पतीकडून कोणतेही उत्तर न आल्याने पत्नीने ॲड. सतीश धोका यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेऊन विशेष विवाह कायद्याच्या कलम २७ अंतर्गत घटस्फोटाची मागणी केली. त्यावरील सुनावणी दरम्यान तुरुंगातील पती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर झाला. त्याने पत्नीच्या मागणीनुसार घटस्फोट मंजूर करावा, असे सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पत्नीने सादर केलेले पुरावे आणि नोटीस ग्राह्य धरून घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केला.
Maharashtra TimesCrime News : तुझे आंघोळीचे व्हिडिओ टाकू का; कॉलेज विद्यार्थ्याची तीन मुलांच्या आईवर वारंवार बळजबरी, अखेर जोडप्याचा ‘क्राईम पेट्रोल’ स्टाईल तोडगा

पतीचे पत्नीकडे दुर्लक्ष

‘पतीने पत्नीकडे दुर्लक्ष केले असून, तिला भावनिक व मानसिक छळास सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. तसेच, अनेक लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तो बराच काळापासून कारागृहात आहे. त्यामुळे पत्नीची बाजू सिद्ध होते,’ असे नमूद करून न्यायालयाने पत्नीचा अर्ज मंजूर करीत विवाह रद्दबातल ठरविण्याचा आदेश दिला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा