Headlines

Pune College Student falls from PMP Bus crushed to death by School Bus at Sinhgad Road Crime News; पीएचडी करण्याचं स्वप्न अधुरं, सिंहगड रोडवर पीएमपी बसमधून उतरताना घसरली, स्कूल बसने चिरडलं, 25 वर्षीय तरुणीचा चटका लावणारा अंत


Pune PMPML Bus Accident : सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसच्या पुढील दरवाजातून उतरताना कांचनचा पाय घसरला. त्यामुळे ती थेट रस्त्यावर पडली. त्याच वेळी स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने तिला प्राण गमवावे लागले.

Pune Sinhgad Road PMP Bus Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसमधून उतरताना रस्त्यावर पडलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीला मागून आलेल्या स्कूल बसने चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. कांचन बळवंत खड्डा (वय २५, मूळ रा. हनुमानगड, राजस्थान) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

दोन्ही बस चालकांवर गुन्हा

ती संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. अपघातास जबाबदार धरुन पीएमपी आणि स्कूल बसच्या चालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दोन्ही चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

उतरताना पाय घसरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ‘डीआयएटी’च्या कृष्णा होस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक असल्याने कांचन खडकवासला येथून पीएमपी बसने निघाली होती. सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर पीएमपी बसच्या पुढील दरवाजातून उतरताना तिचा पाय घसरला. त्यामुळे ती रस्त्यावर पडली.

Maharashtra TimesSolapur Crime : 42 वर्षीय विवाहितेचं 27 वर्षीय तरुणाशी इन्स्टावर सूत जमलं, मुलगा-नवऱ्याला सोडून आली, लग्नाचा तगादा, प्रियकराची दुर्दैवी अखेरत्या वेळी स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली ती आली. यात कांचन गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बस चालकांना ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही वाहनांच्या चालकांची भूमिका आणि अपघातावेळी वाहनांची स्थिती याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ गर्दी झाली होती. तरुण विद्यार्थिनीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Maharashtra TimesRed Suitcase Murder : आई हरवलेय, मुलाची तक्रार; रेड ट्रॉली बॅगेत बॉडीचे अवशेष सापडले, CCTV मध्ये दिसलेल्या कपलच्या घरी जाताच डब्यात भयंकर खेळ

पीएच.डी.चे स्वप्न अधुरे

तिने बनारस हिंदू विद्यापीठातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एमटेकच्या दुसऱ्या वर्षात ‘सेमीकंडक्टर चिप डिझाइन’ विषयाचे शिक्षण घेत होती. या विषयात पीएच.डी. करण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने तयारीही सुरू केली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा