Headlines

Pune Bhor Nasrapur Case Verdict Special Court Bhimrao Kamble gets Death Penalty Crime News; पुणे भोर नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे याला शिक्षा


Nasrapur Case Verdict : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Nasrapur Bhor Case Verdict Bhimrao Kamble Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी भीमराव कांबळे याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने स्वतंत्र युक्तिवाद करण्यात आला. आज, सोमवारी दिल्या जाणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी पीडित चिमुरडीचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.

न्यायमूर्ती काय म्हणाले?

निकालवाचन करताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके म्हणाले की “सरकारी वकिलांनी युक्तिवादात १२ केसेसचा उल्लेख केला. त्यापैकी अनेक घटनांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य दाखवतात. काही निकालांमध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, मात्र ती हायकोर्टाने रद्द ठरवली. मात्र सत्र न्यायालयाचे निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याचीही उदाहरणं आहेत. क्रूरता, समाजावरील परिणाम या गोष्टींची फाशी कायम ठेवताना विचार केला जातो. पीडिता स्वसंरक्षण करण्याच्या स्थितीत होती का, हेही पाहिलं जातं. दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण ठरु शकते का?” याचाही विचार सर्वोच्च न्यायालय करत असल्याचं न्यायमूर्ती म्हणाले.
Maharashtra TimesMumbai Crime : गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला

दुर्मिळात दुर्मिळ केस

“घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबत का होता, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. या प्रकरणातील सर्व बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवते. कट रचून बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. समाजावर घटनेचे दूरगामी परिणाम घडणार असतील, तरीही फाशीची शिक्षा दिली जाते.” याकडेही अंतिम निकालवाचनात न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं.

कट्टर मित्रांच्या राजकीय वाटा बदलल्या; ओमराजेंविरोधात कैलास पाटील मैदानात

पीडिता असहाय्य, आरोपी वासनांध

“आरोपीचा पूर्व इतिहास हा गंभीर स्वरुपाचा आहे. स्वतःची वासना शमवण्यासाठी त्याने हे कृत्य केलं. वयाव्यतिरिक्त त्याला माफी देण्यासारखं काही नाही. घटना घडली तेव्हा पीडिता असहाय्य होती. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला भीती नव्हती. आपल्याला काही होणार नाही, अशी खात्री असल्यामुळे तो हे कृत्य करण्यास धजावला. लहान मुलीसोबत आरोपीचं कृत्य अत्यंत निर्दयी आणि समाजावर परिणाम करणारं आहे. पीडित कुटुंबाचा कायद्यावरील विश्वास उडाला होता. त्यांनी मुंबई-बंगळुरु हायवे रोखून धरला होता. आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली, एवढी गंभीर घटना आहे. निर्भया प्रकरणानंतर बालकांवरील अत्याचाराविषयी कायदा आला. समाजात उमटलेल्या प्रतिक्रियांचा आम्ही आदर करतो, मात्र आम्हाला कायद्यानुसार चालावं लागतं.” असं न्यायमूर्ती म्हणाले.

Maharashtra TimesVaibhav Jadhav : व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला?

“फाशीची शिक्षाही अपुरी पडेल”

“१६ दिवसात आरोपपत्र दाखल केले, हे सर्व प्रकरणात शक्य होईलच असे नाही. पीडित मुलगी अवघी तीन वर्षांची होती. हत्येनंतरही त्याने अत्याचार सुरु ठेवले. लैंगिक अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालातही सिद्ध झालं आहे. आरोपीने चिमुरडी जिवंत राहील, याचा पर्यायच ठेवलेला नाही. त्याला आजन्म कारावासच काय, त्याला फाशीची शिक्षाही अपुरी पडेल. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कृत्य आरोपीनेच केले हे सिद्ध झाले आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. आरोपीने सुधारण्याची पातळी सोडली आहे. याआधी ५३ व्या वर्षी कुटुंबातील मुलीवर अत्याचार, तर वृद्ध महिलेवरही हल्ला. हे दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण आहे.” असं न्यायमूर्तींनी नमूद केलं.

“मुलीच्या वेदना आणि कुटुंबीयांनी काय सहन केलं असेल, याची कोर्टाला जाणीव आहे. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. विशेष सरकारी वकिलांनी सचोटीने पाठपुरावा केला. डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट आणि फॉरेन्सिक टीमनेही चांगलं काम केलं.” असं म्हणत न्यायालयाने सर्वांची पाठ थोपटली.

Maharashtra TimesSiya Goyal : महाबळेश्वरला केतनसोबत एकाच खोलीत राहावं लागणार, प्रसंग टाळण्यासाठी सियाने 18 जूनचाच प्लॅन रचला, तपासात धक्कादायक माहिती

फाशीच्या शिक्षेच्या मागणीला जोर

याआधी, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा संदर्भ देऊन आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. तर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. गेल्या सुनावणीवेळी, काय शिक्षा द्यायची तूच सांग, या न्यायमूर्तींच्या सवालाने कोर्टात शांतता पसरली होती.

Nasrapur Bhor Case Verdict Bhimrao Kamble  Maharashtra Times (1)

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर येथे एक मे २०२६ रोजी घडलेल्या नृशंस घटनेने राज्यभरात संतापाची लाट उमटली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत तपास पूर्ण करून भीमराव कांबळे याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाल्यानंतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. देशात आजवर खून आणि अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात घटनेपासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना असल्याचे मानले जाते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा