Headlines

Pune Baramati Katfal Village Olympic Standard Sports Hub Built Swimming pool synthetic Track Football Ground; खेळाडूंची नवी पंढरी! बारामतीची मोठी ओळख, कटफळच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स हब’, ऑलिम्पिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवा; वाचा सविस्तर


Baramati Katfal Big Sports Hub : ‘कटफळ येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभरण्यात येणार आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प दर्जेदार उभारण्यात येणार आहे’, असं बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे यांनी म्हटलं आहे.

Baramati Katfal Big Sports Hub
बारामती कटफळ स्पोर्ट्स हब(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
संतराम घुमटकर, बारामती : शिक्षण, उद्योग, शेती आणि विकासाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या बारामतीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. कटफळ गावाच्या माळरानावर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, आर्चरी रेंज आणि क्रिकेट अकादमीचा समावेश असणार आहे. या प्रकल्पामुळे बारामती पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे, तर राज्यातील महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनणार आहे.

विविध खेळांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध

कटफळच्या माळरानावर २० हजार ७६७ चौरस मीटर क्षेत्रावर जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा बारामतीत आयोजित करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. विविध खेळांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला आहे.
Maharashtra TimesPune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब
बारामती, इंदापूर, दौंड, फलटण; तसेच पुरंदर परिसरातील अनेक खेळाडूंमध्ये क्षमता असूनही आधुनिक सुविधांच्या अभावामुळे त्यांची प्रगती खुंटते. कटफळ येथील क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

सर्वांसाठी अत्याधुनिक सुविधा

४०० मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निकषांनुसार तयार होणाऱ्या या ट्रॅकवर धावपटूंना दर्जेदार सरावाची संधी मिळणार आहे. यासोबतच लांब उडीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. फुटबॉलप्रेमींसाठी १०५.४ बाय ६८ मीटर आकाराचे नैसर्गिक गवतावरील मैदान तयार करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यास सक्षम असे हे मैदान बारामतीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे.
Maharashtra TimesPune-Nashik Railway Project : कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल
५० मीटर बाय २५ मीटरचा ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल. याशिवाय डायव्हिंगसाठी स्वतंत्र पूल आणि नवशिक्यांसाठी लहान पूल उभारण्यात येणार आहे.

२०० मीटर लांबीचे स्केटिंग रिंग

७० मीटर लांबीचे आर्चरी रेंज मैदान

पाच नेट्ससह क्रिकेट प्रॅक्टिस पिच उभारण्यात येणार आहेत. क्रिकेट, स्केटिंग आणि तिरंदाजी या खेळांमध्ये वाढच्या रुचीचा विचार करुन या सुविधा नियोजित करण्यात आल्या आहेत.
Maharashtra TimesGulabrao Patil : अरे राजा, आधी स्वतःचा आवाज तर सुधार; गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, ठाकरेंचे 14 आमदार फुटण्याचा दावा

बारामतीची ओळख ‘स्पोर्ट्स हब’

‘बारामती क्रीडा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत असल्याने बारामतीची ओळख ‘विकासाचे मॉडेल’ या पलीकडे जाऊन ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आजवर पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आता बारामतीतच मिळणार असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे’, असं बारामती क्रिकेट क्लबचे सदस्य ॲड. शहानूर शेख यांनी म्हटलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा