Pune Saint Tukaram Maharaj Palkhi Ceremony : देहू-आळंदी परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची आस बाळगणाऱ्या भाविकांना संतभेट दूर वाटू लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थान यांनी वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रस्थान सोहळ्याला येऊ नये, असे आवाहन केले आहे.

सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ
सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ तयार करण्यात आला आहे. भरपावसात रथाची मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणीला पूर आल्याने नदीकिनारी बॅरिकेडींग केले असून, वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ashadhi Wari: आषाढी वारीलाही मुसळधार पावसाचा फटका; ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याआधी वारकऱ्यांना तातडीचे आवाहन
आळंदीत प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरुपात
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या, बुधवारी प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन रथ अर्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता; परंतु मुसळधार पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पावसामुळे प्रस्थान सोहळाही मर्यादित स्वरूपात होणार असून, वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलिस आदी १६६० जणांना फक्त मंदिर प्रवेश मिळेल.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा रुपरेषा
पहाटे ५ वा. ‘श्रीं’ची आणि शिळा मंदिर महापूजा
पहाटे ५.३० वा. तपोनिधि नारायण महाराज समाधी पूजा
सकाळी ९ वा. पादुका महापूजा, इनामदार वाडा
सकाळी १० वा. काल्याचे किर्तन
दुपारी २.३० वा. प्रस्थान सोहळा प्रारंभ
सायंकाली ५ वा. पालखी मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी ६ वा. समाजआरती व मुक्काम, इनामदार वाडा
Lonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू
नाथांच्या दिंडीचेआज प्रस्थान
श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा आज, मंगळवार सात जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. नाथांच्या दिंडीचे आज, मंगळवारी (सात जुलै) प्रस्थान होणार आहे.
ST Shivneri Bus : अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय
आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता पैठण येथील गावातील नाथ मंदिर येथून नाथांच्या पालखीचे प्रस्थान होईल. विसावा ओटा येथून सायंकाळी साडेसहा वाजता पालखी चनकवाडीकडे प्रस्थान करणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन होऊन पालखी प्रस्थान करणार आहे. पैठणच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील अनेक दिंड्या, वारकरी पैठणनगरीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

