Headlines

Prashant Damle On Ashok Saraf : ‘अशोक सराफ यांच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी १८ सिनेमे करावे लागले’, प्रशांत दामलेंनी सांगितला किस्सा


Prashant Damle : प्रशांत दामले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांचा किस्सा सांगितला आहे. १८ सिनेमे केल्यानंतर अशोक सराफ यांनी माझं कौतुक केलेलं, असं प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.

Prashant Damle On Ashok Saraf
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्धी मराठी अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतही सिनेमात भूमिका साकारली आहे. प्रशांत दामले यांनी १८ सिनेमे केल्यानंतर अशोक सराफ यांनी त्यांचं कौतुक केलेलं. याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी सांगितलं आहे.

प्रशांत दामले यांनी सांगितला किस्सा

प्रशांत दामले म्हणाले की, ‘अशोक सराफ यांनी मला आयुष्यात कधी काही शिकवलं नाही. पण, माझ्या १८व्या सिनेमाला त्यांनी मला सांगितलं की, हा सिनेमा तू चांगला केलास. त्याआधी प्रत्येक चित्रपटाच्यावेळी शॉट झाल्यानंतर ते मला सांगायचे की, ‘प्रशांत तू असं-असं केलं असतंच तर मस्त झालं असतं, पुढच्या वेळी लक्षात ठेव’ मी म्हटलं, दरवेळी तुम्ही शॉट झाल्यानंतर का सांगता? थोडं आधी सांगा ना. तर ते म्हणायचे, ‘मी असं कसं सांगणार.’
Maharashtra TimesArbaj Shaikh : ‘मला फक्त दुकानाचं काम करायला लावता, पण सिनेमात घेत नाहीत’, नागराज मंजुळे यांना असं का म्हणालेला अरबाज शेख?
‘माझ्या ‘सवत माझी लाडकी’ या १८व्या चित्रपटाच्या प्रिव्हयुवेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं की, ‘या सिनेमाला बक्षीस मिळण्याची संधी आहे’ आणि त्या सिनेमाला बक्षीस मिळालं. पण, त्यासाठी १८ चित्रपट खर्ची घालावे लागले. त्यावेळी अशोक सराफ यांनी सांगितलं, ‘आता तुला सांगावं लागणार नाही, आता तुला समज आली आहे’ असे सह-कलाकार मला भेटले, हे माझं नशीब’ असं प्रशांत यांनी पुढे सांगितलं.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

सतीश तारे यांची आठवण

प्रशांत दामले आणि दिवंगत अभिनेते सतीश तारे यांनी ‘जादू तेरी नजर’ या नाटकात एकत्र काम केलेलं. याच मुलाखतीदरम्यान सतीश तारे यांच्याबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, ‘सतीश तारेसारखा जिभेनं आणि शरीरानं लवचिक असा माणूस मी कधी बघितला नाही. त्याची बुद्धी इतकी तल्लख होती की, तो कधीच अडखळला नाही. तो एक दिवस एका विंग मधून दुसऱ्या विंगमध्ये सापासारखा सरपटत गेला. माझ्या आयुष्यातले दोन कलाकार जे चॅलेंजिंग आहेत, ते म्हणजे वंदना गुप्ते आणि सतीश तारे. त्यांच्यासमोर तुम्हाला अलर्ट राहावंच लागतं. आता सत्या नाहीये. त्याच्यासोबत मी ‘जादू तेरी नजर’चे ३५० प्रयोग केले आहेत. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला सतीश तारेबद्दल खूप आदर आहे.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलये“तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.
वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. “
आणखी वाचा