Headlines

Prasad Oak : ‘मराठी सिनेमाला सुगीचे दिवस, प्रवीणने हालअपेष्टा सहन करून हा चित्रपट बनवला’, ‘देऊळ बंद २’च्या भरघोस यशावर प्रसाद ओकची पोस्ट


Prasad Oak : प्रसाद ओकनं ‘देऊळ बंद २’च्या यशाचं कौतुक केलं असून प्रवीण तरडे यांचंही कौतुक केलं आहे.

Prasad Oak Praises Pravin Tarde Deool Band 2
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ या सिनेमानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून या सिनेमाचं अनेक कलाकारांनीही कौतुक केलंय. अशातच आता प्रसाद ओकने इन्स्टा लाइव्हवर ‘देऊळ बंद २’ या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं आणि प्रवीण तरडे यांचं कौतुक केलं आहे.

Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?

प्रसाद ओकनं केलं सिनेमाचं कौतुक

प्रसाद ओक म्हणाला की, ‘नमस्कार! ‘देऊळ बंद २’ या आमच्या चित्रपटाननं १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही अत्यंत आनंदाची आणि प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. यानिमित्तानं माझे मित्र आणि या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे, असं मला मनापासून वाटलं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा प्रदर्शित होऊन ४० दिवस उलटून गेलेत आणि अजूनही अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. एकंदर मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आलेले आहेत. ‘राजा शिवाजी’, त्यानंतर आमच्या सईचा, जितेंद्रचा सिनेमा आला त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. अशाचप्रकारे ‘देऊळ बंद २’ सुद्धा सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे प्रवीण तरडे या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजपर्यंत या माणसाला सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही प्रसन्न होत्याच. आता त्याच्या पाठिशी स्वामी सुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आमच्या प्रवीण तरडेला कसलीच चिंता नाही. आता पुढची ५० वर्षे तरी तो मागे वळून बघणार नाही, एवढं नक्की!’
Maharashtra TimesShreyas Talpade : ‘मी होम लोनसाठी पात्र नव्हतो’, पहिलं घर घेण्यासाठी शाहरुखने श्रेयस तळपदेला केलेली मदत, अभिनेत्यानं सांगितला किस्सा

‘प्रवीणने खूप हालअपेष्टा सहन करून हा चित्रपट बनवला होता. माझाही या सिनेमात खारीचा वाटा आहे, त्यामुळे या सिनेमासाठी त्याने काय-काय सोसलंय, पावसामुळे त्याचं किती नुकसान झालंय, त्याला बरेच दिवस शूटिंग थांबवावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे ज्या परिस्थितीतून प्रवीणने हा सिनेमा पूर्ण केलाय, त्यासाठी त्याचं खूप कौतुक करायला हवं. कदाचित यामुळेच हा चित्रपट आज एवढं यश पाहतोय. कारण, प्रवीणने अत्यंत प्रामाणिकपणे स्वामींवर संपूर्ण निष्ठा ठेऊन हा चित्रपट बनवला. त्याचाच प्रत्यय आज आम्हाला सर्वांना येतोय.’

‘अजून एक खास आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, आमच्या पिढीतले जे कोणी दिग्दर्शक आहेत, त्यात माझ्या माहितीतला प्रवीण हा एकमेव असा दिग्दर्शक आहे, ज्याचे बॅक टू बॅक सगळे चित्रपट सुपरहिट झालेत. ‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागापासून त्याचा प्रवास सुरू झाला. मग, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ आणि आता ‘देऊळ बंद २’ खरंतर यामध्ये ‘फुलवंती’ सुद्धा पकडला पाहिजे पण, तो आमच्या स्नेहलने दिग्दर्शित केला होता. पण, प्रवीणचाही त्यात लेखक म्हणून वाटा होता. त्याच्या झोळीत आज हे एवढे सगळे यशस्वी सिनेमे आहेत, त्याबद्दल त्याचं खूप कौतुक!’
Maharashtra TimesSunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’
‘प्रवीण, प्रत्येक सिनेमावर तू किती मेहनत घेतोस, किती काम करतोस, हे मी ‘धर्मवीर’पासून फार जवळून पाहिलंय. या चित्रपटाच्यावेळी सुद्धा तू तेवढेच कष्ट घेतलेस. रात्रभर जागा राहिला असशील. म्हणूनच स्वामींनी आज तुझ्या पदरात एवढं मोठं यश दिलं आहे. प्रवीण मित्रा, असंच काम करत राहा, तू स्वत:चा हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार केला आहेस आणि याचा इंडस्ट्री म्हणून मला प्रचंड अभिमान आहे. ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन! मराठी प्रेक्षकांचेही आभार…तुम्ही पाठिंबा दिलात म्हणूनच हे सगळं शक्य झालं आहे.’ असं म्हणत प्रसादने सर्वांचं कौतुक केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा