Emotional Viral Video: खिशात पैसे नाहीत पण तरी देखील वडिलांनी मोठ्या आनंदात मुलांच्या वाढदिवस साजरा केला. हा व्हिडीओ वडिलांचं प्रेम, त्याग आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी वडील करत असलेला संघर्ष अधोरेखित करतो. हा व्हिडीओ पाहून लोकं भावुक झाले आहेत.

व्हिडीओ पाहून लोकांच्या डोळ्यांत आलं पाणी
लहान मुलांना आपले वाढदिवस साजरे करायला खूप आवडतात. कारण वाढदिवशी त्यांचे सर्व हट्ट पूर्ण केले जातात. त्यांना छान छान भेटवस्तू मिळतात. लोकं त्यांचं कौतुक करतात. खूपच स्पेशल वागणूक मिळते. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात वाढदिवस येतातच असे नाही. देशभरात अशी असंख्य मुलं आहेत, ज्यांना वाढदिवस म्हणजे काय हेच माहीत नसेल. पण जर या व्हिडीओमध्ये झळकलेल्या व्यक्तीसारखे वडील असतील, तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत ते तुमचा वाढदिवस साजरा करतात.
तुम्ही पाहू शकता, घरामध्ये टेबल नाहीये, त्यामुळे रिकामी बादली उलटी ठेवून त्यावर केक ठेवला आहे. बरं, हा केकसुद्धा तीन-चार लहान मावा केक एकत्र करून ठेवून बनवलाय. आणि भाऊ-बहीण एकत्र केक कापत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे, वरकरणी हा वाढदिवस फारच साधा वाटतोय. पण चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून नकळत तुमच्याही डोळ्यांतून पाणी येईल.
(फोटो सौजन्य – theindiaonfeed/Instagram)
नेटकरी झाले भावुक
हा व्हिडीओ theindiaonfeed या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकं हा वाढदिवस पाहून भावुक झाली आहेत आणि या मुलांना भेटवस्तू देण्याची इच्छा असल्याचं म्हणत आहेत.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

