PM Kisan: एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले – elderly farmer from wardha die while waiting for pm kisan yojana fund
PM Kisan: एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले – elderly farmer from wardha die while waiting for pm kisan yojana fund
Wardha Farmer Death- वर्ध्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच निधन झाले आहे. दोन वर्षापासून निधीसाठी उंबरठे झिजवत होते मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वर्धा: केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan Scheme ) आहे. या योजनेचा निधी देशभरातली असंख्य लोकांना निधी मिळत असला तरीही काही जण या निधीपासून वंचित राहिले आहेत. काहींना सुरूवातीचे काही हप्ते आले मात्र त्यानंतर निधी बंद झाला. असाच प्रकार वर्ध्यातील (Wardha) एका वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत झाला. सुरुवातीला काही हप्ते आल्यानंतर योजनेचा निधी मिळाला नाही. यासाठी त्यांना सरकारी कार्यालयाचे अनेकदा खेटे घालावे लागले मात्र निधी प्राप्त झाला नाही आणि अखेर निधीच्या प्रतिक्षेतच त्यांचा मृत्यू झाला. बाबूलाल आत्राम (वय ९४) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे.
बाबूराव आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्यांनी किसान सन्मान निधीचे हप्ते मिळावे यासाठी गेली दोन वर्ष तहसील कार्यालय, कृषी कार्यालय अशा सरकारी कार्यालयात सन्मान निधी मिळावा याकरिता निवेदन, तक्रार केली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. काही ना काही कारणं समोर ठेवत त्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवण्यात आले. स्थानिक आमदार दादाराव केचे यांनीही त्यांच्यासाठी प्रयत्न केले. केचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता मात्र तरीही मार्ग निघाला नाही. अखेर किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच आत्राम यांचे निधन झाले.
कुटुंबियांची प्रतिक्रिया बाबूराव आत्राम यांच्या नातवाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाबूराव सीताराम आत्राम हे अल्पभूधारक शेतकरी होते. १२ व्या हप्त्यापासून त्यांचा निधी मिळत नव्हता. तहसिह कार्यालय, कृषी विभाग प्रत्येक कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालय राज्याच्या मंत्रीपर्यंत हा प्रश्न घेऊन गेलो. तरी त्यावर काही तोडगा निघाला नाही.
आतापर्यंत किसान सन्मान निधीचा १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हा निधी मिळत नाही यासंबंधी अनेक कारणे असू शकतात. ज्यात ई केवायसी नसणे, अर्ज करताना शेतकऱ्याने केलेली चूक, शेतजमीनीची पडताळणी झाली नसणे इत्यादी बाबी. मात्र अनेक शेतकऱ्यांना निधी खात्यात जमा होत असताना अचानक बंद झाला असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्याबद्दल त्यांनी आत्राम यांच्याप्रमाणेच अनेक कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही समस्याचे निवारण होत नाहीत. त्याकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. राजकारण, व्यापार, देश-विदेश, क्रीडा, करिअर यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे.
बीएमएमचं शिक्षण घेत असताना त्यांनी झी २४ तास या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज डेस्कवर काम केले . त्यादरम्यानच त्यांनी जनसंपर्क क्षेत्रातही काम केले. त्यावेळी राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नियोजनात त्यांचा सहभाग होता. व्यावसायिक कॉन्फरन्सचे आयोजनामध्येही सक्रीय सहभाग घेतला. २०१७ मध्ये महाविद्यालयातील सहकाऱ्यांसोबत वेब महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल त्यांनी सुरू केले. ज्यात क्रीडा, राजकारण, देश-विदेश, सिनेमा यासाठी बातम्यांचे लेखन केले. पोर्टलचे सोशल मीडिया हँडलही त्यांनी सांभाळले. पुढे विविध इंस्टाग्राम पेजसाठीही कंटेन्टची निर्मिती केली.
२०२४ मध्ये त्यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वेबसाईटसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. तेथे करिअर, महाराष्ट्र, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातम्या करण्यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणूक , प्रचारसभा, निकाल यांचे विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विशेषत: आंतरराष्ट्रीय, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना त्यांनी प्राधान्य दिलं. बिजनेस सक्सेस स्टोरी, मुंबई लोकल स्टेशनच्या नावाचा इतिहास, प्रजासत्ताक दिन आदी विषयांवर लेख मालिका लिहिली. यासोबत देश, स्थानिक स्तरावरील राजकारण क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बिहार, दिल्ली, मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणूक, निकाल यांचे विश्लेषण केले.
शिक्षण क्षेत्र
२०१७ मध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि माध्यम विभागात शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पालघर येथील वाडा महाविद्यालय, मिरारोड येथील एल आर तिवारी महाविद्यालय, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात माध्यम विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपरही सादर केला. सध्या ते साठ्ये महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
शैक्षणिक पात्रता
नारायण परब यांनी २०१४ मध्ये साठ्ये महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. २०१७ मध्ये त्यांनी मुबई विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सामान्य-ज्ञान स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके जिंकली. वाचन, खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये त्यांना रुची आहे.… आणखी वाचा