Pankaja munde response to opponents on farmer loan waiver implementation; घोषणा झाली की लगेच खात्यात पैसे कसे येणार? ही सरकारी प्रक्रिया आहे! कर्जमाफीवरून मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले
Pankaja munde response to opponents on farmer loan waiver implementation; घोषणा झाली की लगेच खात्यात पैसे कसे येणार? ही सरकारी प्रक्रिया आहे! कर्जमाफीवरून मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले
Farmer Loan Waiver: जुलै महिन्याचा शेवट होईपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत या कर्जमाफीचा थेट लाभ पोहोचवला जाईल आणि राज्यातील बळीराजा पूर्णपणे समाधानी होईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.
कर्जमाफीवरून मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून आणि निधी वितरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “अधिवेशनात किंवा कॅबिनेटमध्ये घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच मिनिटाला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे काय जमा होणार? ही एक कायदेशीर आणि प्रशासकीय सरकारी प्रक्रिया असते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच चालू जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीच्या तांत्रिक बाबींवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “हे सरकार असून अत्यंत भव्य प्रमाणात निधीचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये राज्यातील असंख्य शेतकरी बांधव समाविष्ट असून, त्यांच्या जमिनी आणि कर्जाचे मूल्यांकन (Valuation) करावे लागते. कोणतीही मोठी योजना थेट राबवताना तिची पडताळणी करणे गरजेचे असते. एखादा मोठा निर्णय घेतला की लगेच ‘अजून पैसे आले नाहीत’ म्हणून ओरड करणे चुकीचे आहे. एवढ्या गतीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याची सवय महाराष्ट्रात आमच्याच महायुती सरकारने लावली आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
जुलैअखेरपर्यंत शेतकरी समाधानी होणार
कॅबिनेट बैठकीतील घडामोडींचा हवाला देत पंकजा मुंडे यांनी सांगितले की, नुकतीच या संदर्भात सविस्तर बैठक पार पडली असून, महायुतीचे नेते यावर लक्ष ठेवून आहेत. हा निर्णय नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला आहे आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब
राज्य सरकारच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे १३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी ही कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निकष सुधारणेमुळे २०१९च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा