Pankaj Bhadouria Cancer : ‘मास्टर शेफ ‘ विजेत्या पंकज भदौरिया कॅन्सरचा सामना करत असून त्यांनी हेल्थ अपडेट शेअर केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅन्सरशी लढा दिला आहे. काही कलाकारांनी त्यावर यशस्वीपणे मात केली. सध्या, ‘मास्टर शेफ इंडिया’ सीझन १ च्या विजेत्या पंकज भदौरिया देखील या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. मे महिन्यात त्यांना स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं. मात्र, त्या धैर्यानं या आजाराचा सामना करत आहे. अशातच आता पंकज यांनी हेल्थ अपडेट शेअर केली आहे.
पंकज भदौरिया यांची पोस्ट
पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘कॅन्सरनं माझ्या शरीराची परीक्षा घेतली. पण तो माझा आत्मविश्वास तोडू शकला नाही. आता मी एका उद्देशानं आयुष्य जगत आहे.’
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
‘कॅन्सर माझ्या आयुष्याच्या कथेतील एक अध्याय बनला. पण, ती माझी संपूर्ण कथा कधीच असू शकत नाही. या प्रवासानं माझ्या शरीराची परीक्षा घेतली, माझा आत्मविश्वास वाढवला आणि मला जगण्याचा नवीन उद्देश दिला. मी बरी होत आहे. मी ठरवल्याप्रमाणे, प्रत्येक दिवस कृतज्ञता, धैर्य आणि आनंदानं जगेन. हे वाचणाऱ्या प्रत्येक महिलेला मी नियमित आरोग्य तपासणी करत राहण्याचं आवाहन करते. जर आजार लवकर ओळखला गेला तर सर्व काही बदलू शकतं. आशा बाळगा, काहीतरी उद्देशानं आयुष्य जगा आणि बरं झाल्याचा आनंद साजरा करा.’ असं पंकज यांनी म्हटलं आहे.
मे २०२६ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचं निदान
पंकज यांनी २८ मे २०२६ रोजी त्यांना स्तनाचा कर्करोगाचं निदान झाल्याचं जाहीर केलं. हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘मला स्तनाचा कर्करोग आहे. मला तुमच्या पाठिंब्याची आणि प्रार्थनेची गरज आहे.’
पंकज यांनी २०१० मध्ये ‘मास्टर शेफ इंडिया’चा पहिला सीझन जिंकला आणि त्यांना लोकप्रियता मिळाली. यापूर्वी, पंकज लखनौमधील एका शाळेत मुलांना शिकवायच्या.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा