Pakistan Food Prices: भारतात साखरेचे दर वाढत असताना पाकिस्तानातील किराणा मालाच्या किमतींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुकानदाराने साखर १५० रुपये, पीठ १२५ रुपये, तेल ४५० ते ५५० रुपये, तर तांदूळ १२० ते ३५० रुपये किलो असल्याचे सांगितले. या व्हिडीओवर भारतीय नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

किती रुपयांना मिळतात वस्तू?
हा व्हिडीओ harichandparmarofficial या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ हरिचंद परमार नावाच्या एका पाकिस्तानी व्लॉगरने तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका किराणा मालाच्या दुकानात वस्तूंचे भाव विचारतोय. दुकानदाराने पिठाचा दर १२५ रुपये किलो, मोहरीच्या तेलाचा दर ४५० रुपये, कॅनोला ऑइलचा दर ५५० रुपये, तर साखरेचा दर १५० रुपये किलो असल्याचे सांगितले. तसंच, स्वस्त तांदूळ १२० रुपये, तर महाग तांदूळ ३५० रुपये किलो असल्याचेही दुकानदाराने सांगितले.
(फोटो सौजन्य – harichandparmarofficial/Instagram)
भारतात इतकी महागाई नाही?
हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त स्वस्ताई आहे. तर कोणी म्हणतंय, “इंडिया सर्वात बेस्ट, सार्या जगात हिंदुस्थान आमचा सर्वांत चांगला आहे.” असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

