एन. रघुरामन यांचा कॉलम:शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, ज्ञान तर सागरातच मिळते
गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो हिरव्यागार डोंगरदऱ्यात उभा असावा असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तो एका मठातील वर्गात होता. विद्यार्थी डोळे मिटून जमिनीवर मांडी घालून बसले होते. लांब कुठेतरी घंटा वाजत होत्या, खोलीत पूर्ण शांतता होती आणि एक बौद्ध भिक्खू ध्यानासह दिवसाचा पहिला तास सुरू करत होते. ते तिबेटी भाषेत…
