पाकिस्तानात बस दरीत कोसळून 40 ठार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानच्या अशांत आणि दुर्गम भौगोलिक प्रदेश असलेल्या बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी एक प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दुर्दैवाने किमान 40 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेजवळ घडला. या अपघातामुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण पसरले असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. रस्ते अपघाताची ही दुर्दैवी…
