आमचा पक्ष एकसंध, सर्व नाराजी दूर होतील!:हसन मुश्रीफांचा दावा; अर्थखाते, दादा भुसेंवरील आरोप आणि अलमट्टी धरणावरही स्पष्टोक्ती
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, महायुतीमधील अर्थखात्याचा तिढा आणि मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध असून सर्व नेत्यांची नाराजी लवकरच दूर होईल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हसन मुश्रीफ यांनी…
