Headlines

Nepal Flood: अंत्यविधीसाठी त्यांच्या बॉडी हव्यात, नेपाळ महापुरात जीवलग गेले, कुटुंबीयांचा टाहो


Nepal Flash Flood: नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या पाच दिवस झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या महापुरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा ७०० पार गेला असून अडीच हजारापेक्षा अधीक जण अजूनही बेपत्ता आहे. बचावपथक बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत. कुटुंबीय देखील त्यांच्या जिवलगांचा शोध घेत आहेत. काहींनी वास्तव्याचा स्वीकार करत आपल्या जिवलगांचा अंतिमसंस्कार केला. तर अजूनही लोक नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मग ते जिवंत असो किंवा मृत.

nepal flash flood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये बुधवारी महापूर आला. या महापुरात ७०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक बेपत्ता आहेत. गेल्या पाच दिवसांपासून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. लोक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. आलेल्या महापुरात अनेकांचे जिवलग वाहून गेले. महापुराचा तडाखा बसलेले हजारो लोक आपल्या कुटुंबियांचा नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मग ते जिवंत असो किंवा मृत. आसपासची शोध मदत केंद्र, रुग्णालये, वस्त्या, जवळपास प्रत्येक ठिकाणी शोध घेत आहेत. एक व्यक्ती त्यांच्या पालकांच्या अंत्यविधीसाठी बॉडी मिळावी म्हणून गेल्या चार दिवसांपासून शेकडो किलोमीटर फिरत आहे. तर एकाने तीन दिवस आपल्या आईचा शोध घेतला मात्र यश न मिळाल्याने तिचे अंतिमसंस्कार केले आहे.

nepal flash flood

अंत्यविधीसाठी त्यांच्या बॉडी हव्यात

भोटेकोशीनदीला अचानक पूर आला तेव्हा नदीकाठी असलेले सगळे गाव-वस्त्या वाहून गेले. त्यामध्ये बेत्रावती गावचा देखील समावेश आहे. ४३ वर्षीय लेखनात अधिकारी यांनी बेत्रावती गावात महापूर आला आणि त्यांचे आई-वडील कसे वाहून गेले हे रडत रडत सांगितले. ते म्हणाले, ‘अचानक महापुराचा तडाखा त्यांच्या गावाला बसला. तेव्हा माझी पत्नी मुलगा आणि मुलगी हे उंच भागाकडे धावत गेले. मात्र माझे आई-वडील हे धावू शकले नाही. त्यामुळे पुराच्या पाण्यात दोघेही वाहून गेले. काही दिवसांपूर्वी मला गावातील एका इमारतीच्या छतावर तीन शव आदळून आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी तातडीने बाईकवरून आणि जंगलातून चालत तिथे जाऊन पाहिले. मात्र ते माझे आई वडिलाचे नव्हते.

Maharashtra TimesNepal Flood : घरापासून दीड किमीवर, भारतीय इंजिनिअर नेपाळ महापुरातून थोडक्यात वाचला, पत्नी-मुलगी वाहून गेल्या; म्हणतो, दुडूदुडू धावणाऱ्या बाळाची मिठी कशी विसरु?

मला माझ्या आई-वडिलाची शव हव्या आहेत, जेणेकरून मी त्यांचा अंतिमसंस्कार करू शकेल. मी माझ्या मुलांना आणि पत्नीला काठमांडूमध्ये नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठवले आहे. मी माझ्या आई वडिलांचा शोध आणखी दोन आठवडे घेणार. येवढ्या लवकर मी थांबणार नाही, असे लेखनात अधिकारी यांनी रडत रडत सांगितले.

मनाचा कोपरा म्हणतो ते जिवंत असतील

३५ वर्षीय नवीन तामांग जेव्हा नेपाळमध्ये महापूर आला तेव्हा ते मलेशियात कमला होते. महापुरातत्यांची बायको आणि दोन मुली वाहून गेल्या. ते त्यांचा शोध घेत आहेत. ते म्हणाले, ‘मला माहिती आहे माझ्या अंगाचा वास येत आहे. कारण दारी खोऱ्यातील वातावरण एखाद्या इंडक्शन कुकरप्रमाणे झाले आहे. ज्यामुळे जंगलामध्ये प्रचंड उष्णता आहे. तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अनेक दिवस लोटून गेले आहे. मला माहिती आहे त्या आता सापडणार नाहीत, पण तरीही मनाचा एक कोपरा म्हणतो की, ते जिवंत असतील आणि कुठेतरी अडकले असतील’, असे ते म्हणाले.

बहिणीच्या शोधात गावोगाव पायपीट

३५ वर्षीय ताशबीर तामांग यांची बहीण रश्मी तमांग आणि तिच्या मुली – मोनिका व मनीषा हे पुरात वाहून गेले. ते कुठेतरी सापडतील या अशाने खांद्यावर अतयंत आवश्यक वस्तूंची पिशवी आणि हातात काठी घेऊन ताशबीर तामांग हे डोंगराच्या तीव्र उतारावरून चढत एकामागून एक गावे पालथी घालत फिरत आहेत. ते म्हणाले, ‘काही शेजाऱ्यांकडून मला कळले की त्या कदाचित वाचल्या असतील. त्यामुळे मी प्रत्येक कॅम्पमध्ये जावून पाहिलं, लष्कराच्या नोंदणीमध्ये त्यांची माहिती नोंदवली आणि वाचलेल्या लोकांच्या याद्याही तपासल्या. त्यांनी बेत्रावतीच्या वरच्या भागातील जंगलाचा प्रत्येक कोपरा शोधून काढला. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही.’

जिवलगांच्या मृत्यूचा केला स्वीकार

अशीही काही लोक आहेत ज्यांना शव सापडले नसले तरीही त्यांनी आपल्या जिवलगांचा मृत्यूचा स्वीकार केला. उमेरकोटमधील भैंसी बाजार येथील वासुदेव आणि अर्जुन प्याकुरियाल महापुरातून वाचण्यासाठी आपल्या आईचा हात धरला होता. मात्र पुराच्या पाण्यात त्यांचा हात सुटला आणि प्रवाहात त्यांची आई वाहून गेली. या भावांनी आपल्या आईचा तीन दिवस अहोरात्र शोध घेतला, मात्र यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आईच्या मृत्यूचा स्वीकार करत अंतिमसंस्कार केले.

वॉच टॉवर अजूनही उभा

बेत्रावती हे गाव महापुरात वाहून गेले. बहुतेक इमारती देखील वाहून गेली. पण वॉच टॉवर अजूनही उभा आहे. त्या घड्याळीच्या काट्यांनी ९:३० वाजता वेळ थांबवली. त्याचवेळी सकाळी नेपाळमध्ये महापूर आला.