Nepal Flood Update: नेपाळमध्ये आलेल्या पुराने मोठं नुकसान झालं. आता पर्यंत १६२ शव चिखलातून बाहेर काढले आहे. पोलीस बेपत्ता असलेल्यांच्या शोधासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. नेपाळने चीन येथील जिऑलॉजिकल डिझास्टर धरण फुटल्याने हा पूर आला असल्याचा दावा केला. मात्र या दाव्याला चीनने फेटाळून लावले आहे आणि ही बातमी फेक असल्याचे म्हटले आहे. चीनने ही बाब फेसबुक पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.

चीनने फेसबुक पोस्ट करत दिले प्रत्युत्तर
नेपाळमध्ये आलेल्या पुरावर चीनने एक फेसबुक पोस्ट करत सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा भूकंप किंवा भूंकपण सदृश्य ग्लॅसिअर सकाळी २६ ऑगस्टला नेपाळी बाजूला कोसळण्याची घटना घडली. यात मोठ्या प्रमाणात चिखलाच्या प्रवाहाने ग्यिरोंग-रसुवागढी सीमावर्ती भागातील नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूच्या लोकांचा मृत्यू झाला तर अनेकजण बेपत्ता आहे.
आरोप करून काहीच होणार नाही आहे सहकार्य केल्यानेच जीव वाचतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास १७५ जणांचा जीव गेला तर १३०० लोक बेपत्ता आहे. अचानक आलेल्या या पुराने अनेक गाव, रस्ते, इमारती उध्वस्त केल्या आहेत. असे चीनने फेसबुक पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
१६२ शव काढले बाहेर
नेपाळ पोलिसांना आतापर्यंत चिखला खाली अडकलेले १६२ शव बाहेर काढले असून काही लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्तांमध्ये १४२ जण भारतीय आहेत. यामध्ये कैलास मानसरोवरला जाणारे तीर्थ यात्रींचा समावेश आहे. पोलीस चिखला खाली अडकलेले शव आणि जीवित वाचलेल्या लोकांच्या शोधासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. पूर भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम अधिकारी करत आहे.
दुर्घटनेनंतरकाही तास ४०३ पर्यटक बेपात्त होते. त्यात ३४१ लोक हे विदेशी होते. बेपत्ता असलेल्ल्यांमध्ये १४२ नागरिक हे भारतीय असून ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, मलेशिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि अमेरिका येथील नागरिकांचा समावेश आहे. अशी माहिती पर्यटक मंडळाने दिली आहे.
Pakistan Fire : पाकिस्तानच्या बाल रुग्णालयात भीषण स्फोट, १६ पैकी १५ नवजात अर्भकांचा जागीच मृत्यू
नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे मानले आभार
सकाळी ९ वाजताच्या सुमारास तिबेटच्या बाजूने भोटे कोसी नदीत महापूर आला. यापुरामुळे तिबेटच्या सीमेला लागून असलेले रसुवा आणि धाडींग, नुवाकोट या जिल्ह्यांना मोठा नुकसान झाला. नेपाळचे प्रधानमंत्री बालेन्द्र शाह यांनी मदतीसाठी सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भारताने हवाई दलाने १० टन मदत साहित्य आणि वैधकीय साहित्य मालवाहू विमान द्वारे पाठवले. यामदतीसाठी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. बालेन्द्र शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, या कठीण काळात तुम्ही नेपाळप्रती व्यक्त केलेली सहानुभूती आणि मदत यासाठी आभारी आहोत. या एकजुटीमुळे नेपाळ आणि भारतमध्ये घट्ट मैत्रीचे प्रतिबिंब आहे, ज्यांना आम्ही अत्यंत महत्वाचे मानतो. असे ते म्हणाले.

