NCP Merger : पवार- मोदी भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? – sharad pawar statement on possibility of merging ncp and joining nda
NCP Merger : पवार- मोदी भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? – sharad pawar statement on possibility of merging ncp and joining nda
#sharadpawar #ncp #ncpmerger #nda #pmmodi ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?’ गेल्या काही दिवसांत दिल्लीत घडलेल्या हायव्होल्टेज घडामोडींनी या चर्चांना पुन्हा एकदा उधाणच आले आहे. याला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट… त्या पाठोपाठ पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांचे ६ जनपथवर धाव घेणे… दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या वेगळ्या भेटी… आणि त्यातच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा! या सर्व भेटीगाठींचा नेमका अर्थ काय? दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण अंतिम टप्प्यात आहे की हा केवळ एक राजकीय डावपेच आहे? रोहित पवारांच्या भूमिकेमुळे या समीकरणात काय बदल होऊ शकतात? आणि स्वतः शरद पवारांनी यावर काय म्हटलंय या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया