Headlines

Nashik Trimbakeshwar Temple: ऑनलाइन देव, ऑफलाइन धक्का! त्र्यंबकमध्ये 2100च्या अधिकृत अभिषेकाला 21 रुपयांचे ‘डिजिटल दर्शन’ – nashik trimbakeshwar temple rs 2100 abhishek ritual fraud case


Nashik Trimbakeshwar Temple: फसवणुकीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शिवप्रसाद निवासाच्या बुकिंगसाठी बनावट संकेतस्थळ, एआयच्या मदतीने तयार केलेली दिशाभूल करणारी छायाचित्रे आणि अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

nashik trimbakeshwar
नाशिक त्र्यंबकेश्वर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरच्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आता भक्तांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मोबाइल उघडा, पैसे भरा आणि पूजा झाल्याचा फोटो-व्हिडीओ घ्या. तंत्रज्ञानाने भक्तीला एवढे सोपे केले, की आता अधिकृत आणि बनावट यातला फरकही मोबाइलच्या स्क्रीनवरच हरवू लागला आहे.

अधिकृत व्यवस्थेनुसार देवस्थान ट्रस्टच्या संकेतस्थळावर २१०० रुपये भरून पूजा बुक होते. नाव, गोत्र भरायचे, पुरोहित पूजा करतात, फोटो-व्हिडीओ येतो आणि दक्षिणेचे ६० टक्के पुरोहितांना, तर ४० टक्के ट्रस्टला मिळतात. म्हणजे भक्तीही आता व्यवस्थित डिजिटल अर्थकारणात सामील झाली आहे. मात्र, बाजारपेठेला नियम कुठे मान्य असतात? काही अॅपनी थेट ‘भक्तीचे डिस्काउंट ऑफर’च आणली. अवघ्या २१, ५१ किंवा १०१ रुपयांत अभिषेक, फोटो आणि व्हिडीओ! या प्रकाराने त्र्यंबकेश्वरच्या भक्तिमार्गावर आता ‘ऑनलाइन अभिषेक’च्या नावाने फसवणुकीची नवी पायवाट तयार झाल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Timesयंत्रणा थंड, ‘जंक फूड’ उदंड! नाशकात शालेय परिसरात राजरोस विक्री; FDAचा आदेश कागदावरच
या प्रकरणी देवस्थान ट्रस्टने पोलिसांकडे धाव घेतली आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावाचा, मंदिराच्या छायाचित्रांचा आणि धार्मिक माहितीचा अनधिकृत वापर करून बनावट संकेतस्थळे, मोबाइल अॅप आणि सोशल मीडियावर जाहिराती सुरू आहेत. ‘श्रावण सोमवार जलाभिषेक’, ‘गोदावरी जलाभिषेक’, ‘बिल्वपत्र अभिषेक’, ‘विशेष अभिषेक’ अशा सेवा उपलब्ध असल्याचा आभास निर्माण करून भाविकांकडून पैसे घेतले जात आहेत. ट्रस्टचा दावा आहे, की अशा प्रकारच्या पूजा अधिकृतपणे होत नाहीत आणि हा प्रकार भाविकांची, तसेच देवस्थानची फसवणूक करणारा आहे.

श्रावण महिन्यात भावनेचा आणि श्रद्धेचा ओघ वाढतो. अशा वेळी श्रद्धेवरच ‘ऑनलाइन ऑफर’ लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे; अन्यथा उद्या भक्ताला अभिषेक झाला की नाही यापेक्षा, पैसे नेमके देवाकडे गेले की फसवणूक करणाऱ्यांकडे, याचाच जास्त विचार करावा लागेल.
Maharashtra TimesNashik Crime : दुसऱ्या पत्नीसह सुखी संसार, अचानक लेकीच्या विरहाचं दुःख, तिसऱ्या दिवशी पित्याने घेतला जगाचा निरोप
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावे बनावट मोबाइल अॅप तयार करून भाविकांची व देवस्थान ट्रस्टची फसवणूक होत आहे. अनधिकृतपणे मंदिराची छायाचित्रे वापरली जात आहेत. याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.-अमित माचवे, प्रशासकीय अधिकारी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा