Headlines

Nashik Married Woman Rupali Patil dies in Vadivarhe Resort Boyfrien Deepak Saindane kills over Love Affair posing Car Accident Crime News; 43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट


Nashik Rupali Patil Murder : रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रुपाली आणि दीपक यांचा वाद झाला. वादावादीचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर रुपाली रिसॉर्टच्या गेटकडे जाताना दीपकने पाठीमागून वेगाने कार नेत त्यांना जोरदार धडक दिली.

Nashik Rupali Patil Murder _ Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : ३४ वर्षीय विवाहिता रुपाली पाटील यांचा सुरुवातीला कार अपघातात मृत्यू झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. नाशिकच्या वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ कारच्या धडकेत रुपालीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र विवाहेतर संबंधातून ४३ वर्षीय प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला. दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते,

प्रियकराला अटक

रुपाली पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर प्रियकर दीपक शिवाजी सैंदाणे (४३, रा. अंबड) याने पाठीमागून कारने धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रियकर दीपक सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे.

कंपनीच्या कामानिमित्त वाडीवऱ्हेला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली नीलेश पाटील (३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) या सिडको परिसरात असलेल्या एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरी करत होत्या. कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत कारने वाडीवऱ्हे परिसरात गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवायला गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असतानाच दीपकने कारमध्ये मद्यपान केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Maharashtra TimesHyderabad Accident : भरधाव ॲस्टन मार्टिनची धडक, Inorbit मॉलबाहेर 26 वर्षीय तरुणीचा दुःखद अंत, राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा

रिसॉर्टवर वाद झाला

रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रुपाली आणि दीपक यांच्यात वाद झाला. या वादावादीचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर रुपाली रिसॉर्टच्या गेटकडे जात असताना दीपकने पाठीमागून वेगाने कार नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला.

रुपाली पाटील यांच्या पश्चात पती नीलेश पाटील, ७ वर्षांची मुलगी, सासू आणि सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच सिडको परिसरात एकच खळबळ उडाली.

Maharashtra TimesTransgender arrested : तुमच्या नवऱ्याला बरं करतो! तृतीयपंथी असल्याचं भासवून घरात घुसला, मुंबईत एअर होस्टेसवर अत्याचार, 28 वर्षीय तरुणाला चार तासात अटकघटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे वाटत होते. परंतु परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तात्काळ ताब्यात घेतले होते. कसून चौकशीत रुपाली आणि आपले गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली दीपकने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा