गुजरात राज्यातील वलसाड येथील रहिवासी असलेल्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा नातलग जितू अण्णाराव पवार आणि भोंदू विशाल रामदास खंडागळे (रा. पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणापीडितेची नातेवाईक जितू पवार याच्याशी ओळख होती. जितूने तिला लग्नाची विचारणा केली होती. जितू पवार हा फुलेनगर परिसरात विशाल खंडागळे याच्याकडे राहत होता. खंडागळेकडून पवार हा भोंदूगिरी शिकत होता. काही दिवसांपूर्वी जितूने पीडितेला मारहाण व दमदाटी केली. त्याबाबत महिलेने खंडागळेकडे तक्रार केली असता, ‘आपल्याला स्मशानभूमीत पूजा करावी लागेल. त्याकरिता खर्च येईल. म्हणजे जितू तुझ्याशी व्यवस्थित वागेल व लग्न करेल’, असा बनाव खंडागळेने रचल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही पोलिसांत धाव घेत पीडितेला धीर देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत ‘अंनिस’चे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे पाठपुरावा करीत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या सूचनेनुसार पथक पुढील तपास करीत आहे.
..असे झाले आर्थिक व्यवहार
२० फेब्रुवारी – १० हजार रुपये
६ मार्च – २० हजार रुपये
३० मार्च – ५ हजार रुपये
३ एप्रिल – १० हजार रुपये
१३ मे – १३ हजार रुपये
१४ मे – १ हजार ९०० आणि १७ हजार १०० रुपये
Nashik News : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकलाअर्ध्या रात्री स्मशानभूमीत लिंबू-मंत्रोच्चार
पीडित महिला १२ जुलै रोजी वलसाड येथून नाशिकमध्ये आली. त्याच रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत, एका मंदिरासमोर तिला नेण्यात आले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी जाळीवर लिंबू, हळद-कुंकू व लाह्या ठेवून मंत्रोच्चार करण्यात आले. महिलेच्या अंगावरून लिंबू उतरवून नदीत सोडण्यात आले. तसेच पूजा पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, पूजेनंतरही पवारने महिलेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. महिलेने विचारणा केली असता, ‘अजून पूजा करावी लागेल, जितूला हळद लावावी लागेल’, असे सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

