Headlines

Nandurbar Prakasha Primary School Teacher Body Found in Tapi River his Motorcycle Parked on Bridge; एकीकडे प्रजासत्ताकदिनाचा उत्साह, दुसरीकडे तापीत केंद्र प्रमुखाची बॉडी, लेकीची पोलिसांना माहिती; घटनास्थळी पोहोचले तर…


Nandurbar Government Employee Body Found Tapi River : नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शासकीय केंद्र प्रमुखाचा तापी नदी पात्रात संशयीतरित्या मृतदेह आढळला आहे.

Nandurbar Government Employee Body Found Tapi River
शहादा प्राथमिक शिक्षक तापी नदीत मृतदेह(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नंदुरबार, महेश पाटील : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्रातील केंद्रप्रमुखाचा मृतदेह प्रकाशातील तापी नदी पात्रात काल प्रजासत्तादिनाच्या दिवशीच आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयत केंद्रप्रमुख यांच्या मुलीच्या सांगण्यावरुन पाण्यात बुडून मृत्यू चालण्याची नोंद करण्यात आली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकी जुन्या पुलावर आढळली

शहादा येथील रहिवाशी किशोर विठ्ठल महाले (वय 44) हे शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्रात केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृतदेह प्रकाशा येथील जुन्या पुलाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात मध्यभागी काल रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास आढळला. त्यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर प्रकाशातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, त्यांची दुचाकी जुन्या पुलावर आढळून आली. किशोर महाले हे मनमिळावू स्वभावाचे होते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी केली. याप्रकरणी मयताची मुलगी लोकेश्वरी किशोर महाले यांनी शहादा पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आकस्मिक नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील करीत आहेत.
Maharashtra TimesVikhroli Accident : स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, विक्रोळीत धक्कादायक घटना, चिंधीवाला कारणीभूत?

आत्महत्या की घातपात?

प्रकाशा येथील जुन्या पुलावर किशोर महाले यांची दुचाकी मिळून आहे. तर त्यांच्या मृतदेह तापी नदी पात्रात 26 जानेवारीला आढळून आला. एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे आदर्श शिक्षक म्हणून परिचित असलेल्या श्री.महाले यांच्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले होते. त्यांची आत्महत्या की घातपात? हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
Maharashtra TimesMalad Alok Singh Murder : ‘मी त्याला लहानपणापासून वाढवलं, आता मला कोण…; भावाच्या आठवणीत बहिणीचा कंठ दाटला; म्हणाल्या…

महावितरणने घेतला वृद्धाचा बळी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या वृद्ध रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा