Nagpur News:रामनगरमध्ये पक्षिप्रेमींच्या सतर्कतेमुळे विक्षिप्त माणसाच्या तावडीतून कावळ्याचे प्राण वाचवण्यात आले. एका व्यक्तीने खाण्यासाठी कावळा पकडला असून त्या व्यक्तीच्या तावडीतून कावळ्याची सुटका करण्यात आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर : रामनगर परिसरातून एक व्यक्ती सायकलच्या कॅरिअरमध्ये कावळा अडकवून जात असल्याचे पक्षिप्रेमी शारदा भांदवकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून ‘कावळा कुठे घेऊन जात आहे’, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित व्यक्तीने कावळा घरी नेऊन खाणार असल्याचे सांगितल्याचा दावा पक्षिप्रेमींनी केला.
कावळ्याचे पंख तोडले
याचवेळी तो कावळ्याचे पंखही तोडत असल्याचे पाहून भांदवकर यांनी कावळा ताब्यात देण्याची मागणी केली. संबंधित व्यक्तीने नकार दिल्याने शारदा यांनी स्मिता मिरे यांच्याशी संपर्क साधला. मिरे यांनी पक्षिप्रेमी प्राजक्ता देव यांना घटनास्थळी पाठविले. शारदा भांदवकर आणि प्राजक्ता देव यांनी कावळ्याला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडविले. यावेळी काहीसा वादही झाला.
व्यक्ती घाबरून पळून गेला
नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून संबंधित व्यक्ती सायकल घेऊन निघून गेली. सुटका केलेल्या कावळ्याला दाभा परिसरातील ‘सेव्ह स्पीचलेस’ संस्थेच्या शेल्टरमध्ये नेण्यात आले. डॉ. आदित्य सिंग यांनी त्याच्यावर उपचार केले. पंख दुखावल्याने कावळ्याला काही दिवस उडता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती स्मिता मिरे यांनी दिली.पक्ष्यांना इजा करणे हे पशुक्रूरता निवारण अधिनियम, १९६०चे उल्लंघन असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षिप्रेमींनी केली.
खाण्यासाठी कावळा पकडून नेणाऱ्या व्यक्तीला पक्षिप्रेमींनी रामनगर परिसरात रोखले आणि जखमी कावळ्याची सुटका केली. सायकलच्या कॅरिअरमध्ये अडकवल्याने कावळ्याचे पंख जखमी झाले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मानवाच्या विकृतींच्या घटना ह्या नेहमीच हादरवणाऱ्या असतात. काही घटना ह्या माणसाने माणसांच्या बाबतीत केलेल्या असातात पण हा विकृतीचा प्रकार अगदीच विचित्र आहे. एका व्यक्तीने कावळ्याला खाण्यासाठी पकडले . परंतू पक्षिप्रेमींच्या जागृतीमुळे या कावळ्याचा जीव वाचला.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा