Headlines

Nagpur Crime: भोंदूगिरीचा खुलेआम धंदा! ठिकठिकाणी सर्रास जाहिराती; छायाचित्र पाहून समस्यांचे निराकरण अन् दिव्यशक्तीचे दावे – nagpur fake godmen scams publicity being generated through photographic and advts


प्रवीण लोणकर, नागपूर : ‘तुम्ही कोणत्याही संकटात असाल तर तुम्ही त्यातून हमखास बाहेर याल, केवळ तुमचे आणि ज्याच्यापासून तुमच्या आयुष्यात संकट निर्माण झाले, त्याचे छायाचित्र आणि नाव पाठवा. अजमेरला या, अन्यथा फोनवरच तुमचे समाधान करू’, असा दावा भोंदूबाबांकडून केला जात आहे. नागपुरात जागोजागी पत्रके छापून सर्वसामान्यांना फसविण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू असून, अंधश्रद्धेविरुद्ध काम करणाऱ्या संस्था आणि प्रशासनाला हे खुले आव्हानच आहे.

राज्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ प्रभावीपणे लागू असतानाही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे. ‘मटा’ने अशाच एका बाबाशी संपर्क साधला असता अघोरी शक्तीचा वापर करून समाधान करण्याचे दावे त्याने केले.

Maharashtra TimesCrime News: तीन मित्रांचा प्लॅन, पण पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; नामांकित हॉटेलमध्ये धाड टाकताच रंगेहाथ सापडले!
या जाहिरातींमध्ये करणी, जादूटोणा, प्रेमप्रकरणात यश, पती-पत्नीतील वाद मिटविणे, संतानप्राप्ती, शत्रुनाश, कोर्ट-कचेरीतील विजय, नोकरीत बढती, व्यवसायातील अडचणी दूर करणे अशा विविध समस्यांवर प्रभावी उपाय करण्याचे दावे केले जातात. अशा दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही पुढे आली आहेत. सरकारी बसेस, रेल्वे, स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अशा जाहिराती राजरोसपणे झळकत असून, त्या तातडीने हटवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केली.

कारवाईचीही भीती नाही
महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जादूटोणा, अघोरी प्रथा किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या कृत्यांचा प्रचार करणे, अशा कृत्यांच्या जाहिराती करणे, त्यांना प्रसिद्धी देणे किंवा अशा प्रकारच्या फसव्या दाव्यांद्वारे नागरिकांची दिशाभूल करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास सहा महिन्यांपासून सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद कायद्यात आहे. असे असतानाही राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रेल्वेस्थानके, सार्वजनिक भिंती आणि अन्य ठिकाणी अशा जाहिराती सहजपणे लावण्याचे धाडस होतेच कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

VIDEO | वाहनाच्या टपावर चढून पैशांची उढळण,पोलिसांकडून कायद्याचा बडगा

असा झाला संवाद
प्रतिनिधी : बाबा मैं संकट में हूँ.
भोंदूबाबा : तू चिंता मत कर, खुलकर समस्या बता.
प्रतिनिधी : बाबा प्रॉपर्टी का मामला हैं, रिश्तेदार ने प्रॉपर्टी हडप ली.
भोंदूबाबा : समशान भभूती का काम करना पडेगा.
प्रतिनिधी : समाधान तो होगा ना?
भोंदूबाबा : पहले आप को आप का और रिश्तेदार का फोटो भेजना पडेगा.
प्रतिनिधी : फिर क्या करना पडेगा?
भोंदू बाबा : अजमेर में हमारा दरबार हैं, वहा आना पडेगा.
प्रतिनिधी : बाबा, इतने दूर नहीं आ सकते
भोंदू बाबा : फोटो देख के भी काम हो सकता हैं.
प्रतिनिधी : खर्चा कितना आयेगा?
भोंदू बाबा : पहले फोटो भेजो, तभी बता सकते हैं. पहले जादा नहीं बता सकते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत