Headlines

Nagpur Bribe Case: नागपुरात ACBची मोठी कारवाई; चेक पोस्टवर 500 रुपयांची लाच घेताना RTO निरीक्षकासह दोघे अटकेत


Nagpur RTO Bribe Case: शेंडे यांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर या निवेदनाची आरटीओच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे.

nagpur bribe case.
नागपूर आरटीओ लाच प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर: तपासणी नाका पार करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील खुर्सापार सीमा तपासणी नाका येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

निरीक्षक साजन शालिग्रामजी शेंडे (वय ५०, रा. निर्मलनगरी, नंदनवन) व प्रवीण बाबुराव गायधने (वय ५०, रा. रघुजीनगर) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. शेंडे हे आरटीओच्या ग्रामीण कार्यालयात कार्यरत असून ते प्रवीणच्या माध्यमातून लाच घेत होते. ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.

Maharashtra TimesNagpur Crime: ‘लव्ह ट्रँगल’चा भयानक शेवट; एकाला निर्घृणपणे संपवलं, दोन आरोपी अटकेत, टीपू सुलतान चौकाजवळील घटना
काही दिवसांपूर्वी ट्रकचालक माल घेऊन मध्य प्रदेशात गेला. यावेळी त्याला ५०० रुपयांची लाच मागण्यात आली. १२ जूनला पुन्हा चालकाला मध्य प्रदेशात माल घेऊन जायचे होते. यावेळीही ५०० रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती असल्याने ट्रकचालकाने १० जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्याकडे तक्रार केली. प्रधान यांनी चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. अपर अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भारती गुरनुले, निरीक्षक मयूर चौरसिया, राजकिरण येवले, हेडकॉन्स्टेबल योगेश साधनकर, कांचन गुलबासे, उपेंद्र आकोतकर, सचिन किन्हेकर व हेडकॉन्स्टेबल विलास इंगळे बुधवारी तक्रारीची पडताळणी केली.

प्रवीणच्या माध्यमातून शेंडे हे प्रत्येक ट्रकचालकाकडून ५०० रुपये घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी एसबीच्या पथकाने खुर्सापार तपासणी नाक्यावर सापळा रचला. तक्रारदार ट्रकचालकाकडून शेंडे यांच्याकरिता प्रवीणने ५०० रुपयांची लाच घेतली. पथकाने आधी प्रवीण व नंतर शेंडे यांना अटक केली. दोघांविरुद्ध केळवद पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. एसीबीचे पथक शेंडे यांच्या घराची झडती घेत असून, वृत्त लिहिपर्यंत कारवाई सुरू होती.

Maharashtra TimesVidarbha School Reopening: शाळा 30 जूनलाच! विदर्भाबाबत उच्च न्यायालयाने खडसावले; शिक्षण विभागाचा निर्णय रद्द
तीन महिन्यांपूर्वी दिले होते निवेदन
आरटीओत कार्यरत व निवृत्त अधिकारी हे संगनमत करून गुन्हेगारी टोळ्यांकडून खोट्या तक्रारी देऊन आरटीओच्या (ग्रामीण) अधिकाऱ्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवित आहेत. ते खंडणीची मागणी करून भ्रष्टाचार करीत असल्याच्या तक्रारी करीत आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत आहेत, अशा आशयाचे निवेदन आरटीओतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ३० मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांकडे दिले. या शिष्टमंडळात साजन शेंडे यांचाही समावेश होता. निवेदनात १३व्या क्रमांकावर त्यांचे नाव असून, स्वाक्षरीही आहे. निवेदन दिल्याच्या अवघ्या तीनच महिन्यांत शेंडे यांना खासगी इसमाच्या माध्यमातून लाचप्रकरणात अटक करण्यात आली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा