Headlines

N Chandrasekaran Successor; टाटा समूहात नव्या ‘चंद्रा’चा शोध, उत्तराधिकारीबाबत चिंता; टाटा सन्सच्या नवीन बॉसच्या शर्यतीत कोण-कोण?


TATA Sons News: भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराणे, टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी – टाटा सन्स – चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. पण त्याआधी चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला शक्य तितक्या लवकर उत्तराधिकारी निवडण्याचे आवाहन केले. इतकंच नाही तर गेल्या काही महिन्यांत टाटा ग्रुपचे मुख्यालय – बॉम्बे हाऊस – मधून नेतृत्वाबाबत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत.

पण, अलीकडे चंद्रशेखरन यांच्या घोषणेमुळे गेल्या काही महिन्यांतील अनिश्चिततेत भर पडली असून टाटा सन्स व टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळांमधील अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेल्या भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत.

एन. चंद्रशेखरन यांचा उत्तराधिकारी कोण?

अशा परिस्थतीत, आता चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर सर्वांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की टाटा सन्सचा नवीन बॉस कोण बनणार? चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार असून यामुळे टाटा सन्सकडे या स्थित्यंतराचे नियोजन करण्यासाठी भरपूर वेळ असेल, पण टाटांचा नवा शोध इतकं सोपं काम नसेल. टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन सध्या संभावित उत्तराधिकाऱ्यांपैकी चर्चित नाव आहे.

Maharashtra Timesटाटा सन्सच्या चेअरमनला पगार किती असतो? पाच वर्षात 650 कोटी रुपये कमवणाऱ्या एन चंद्रशेखरन यांचा पगार, बोनस सर्वांची माहिती

टाटा सन्सच्या अध्यक्षांची निवड कशी होते?

टाटा सन्सच्या नियमांनुसार, पाच सदस्यीय समितीद्वारे अध्यक्षांची निवड केली जाते. यापैकी 3 सदस्य सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नामनिर्देशित केले जातात, तर एक सदस्य टाटा सन्सच्या संचालक मंडळातील असतो आणि पाचवा सदस्य संचालक मंडळाद्वारे स्वतंत्र सदस्य निवडला जातो. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार विश्वस्त सभा आयोजित करता येत नसल्याने, SRTT सध्या यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे, चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याच्या योजनेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

चंद्रशेखरन यांनी अचानक राजीनामा जाहीर केल्यावर टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष आणि दिवंगत रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा अंतरिम अध्यक्ष बनू शकतात. टाटा स्मूहाच्या धोरणानुसार नोव्हेंबरमध्ये टाटा समूहाच्या इतर कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त होणार असून बिगर-कार्यकारी संचालकांसाठी निवृत्तीचे वय 70 वर्षे निश्चित केले आहे. पण, नोएल टाटा, ट्रस्टचे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि निवृत्तीच्या वयाची अट ट्रस्टच्या नामनिर्देशित सदस्यांना लागू होत नसल्यामुळे टाटा सन्सचे संचालक म्हणून कायम राहतील.

Maharashtra TimesN Chandrasekaran Resign: एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्स चेअरमन पदाचा राजीनामा का दिला? पद सोडण्यामागची 2 कारणं

चंद्रशेखरन यांच्यानंतर नरेंद्रन?

नोएल टाटांच्या जवळच्या लोकांच्या माहितीनुसार अद्याप काहीही निश्चित झाले नाही आणि अजूनही समूहात नेतृत्व बदलात नेतृत्व बदलाच्या हालचाली झालेल्या नाही. पण, नोएल टाटांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, भविष्यात नरेंद्रन नोएल यांच्या मुख्य टीमचा भाग असू शकतात, तर या दरम्यान RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी नरेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे.

एन चंद्रशेखरन यांची निवड कशी झालेली

ऑक्टोबर 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी कंपनीने 5 सदस्यांची निवड समिती स्थापन केलेली. या शोधप्रक्रियेदरम्यान रतन टाटांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेलेली.

त्यावेळी या समितीत रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, माजी मुत्सद्दी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश होता. अखेरीस समितीने एकमताने चंद्रशेखरन यांची शिफारस केली, जे त्यावेळी TCS चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. जानेवारी 2017 मध्ये टाटा सन्सच्या मंडळाने शिफारस स्वीकारली आणि त्यानंतर पुढील महिन्यात चंद्रशेखरन यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. 2017 मध्ये टाटांनी चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

मात्र, आता परिस्थितीत काहीशी बदलली आहे. मिस्त्रींना पदावरून पदावरून हटवल्यावर नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली, त्यामुळे उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असताना रतन टाटांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केलेले. पण, आता याउलट चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यामुळे सध्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी उत्तराधिकारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समूहाला काही महिन्यांचा कालावधी मिळेल. अशा स्थितीत, टाटा सन्सला हंगामी अध्यक्षाची गरज न भासता थेट चंद्रशेखरन यांच्याकडून उत्तराधिकाऱ्याकडे सूत्रे सोपवली जाऊ शकतात.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत