Headlines

Mumbai Rain: मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्ते उखडले; BMCच्या डांबरीकरणासह तात्पुरता मुलामा केलेल्या कामाचे पितळ उघडे – mumbai roads torn up and riddled with potholes due to heavy rainfall


Mumbai Rain: अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात खड्डे बुजवताना तात्पुरता मुलामा म्हणून नुसतेच डांबरीकरण किंवा डांबर आणि खडी यांचे मिश्रण असलेले मास्टिक वापरले जाते.

bmc
mumbai rain(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
सुशांत मोरे, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून मुंबईतील रस्ते अक्षरश: उखडले आहेत. खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत असून अपघातांचा धोका वाढला आहे. दादर, मालाड, गोरेगाव, वांद्रे पश्चिम हिल रोड, कुर्ला पश्चिम भागातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होतात. महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते.

Maharashtra TimesNavnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
यंदा महापालिकेने परिमंडळ १ ते ७ मधील रस्त्यांवरील खड्डे आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीच्या कामांचे १६ प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले आणि ते मंजूरही झाले. काँक्रीटीकरणामुळे खड्डे बुजवण्याचा खर्च कमी झाल्याचा दावाही मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र हा दावा करतानाच कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबईतील अनेक भागांत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यावरील काही खड्डे हे नुसते डांबरीकरण करून किंवा डांबर-खडीचे मिश्रण वापरून खड्डे बुजवणारी मास्टिक यंत्रणा वापरण्यात आली. मात्र पावसाळा सुरू होताच अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. लहान मोठ्या आकाराच्या खड्ड्यांतून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Maharashtra TimesMumbai Rain : मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?
दादर पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर पडल्यानंतर सेनापती बापट मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. स्थानकाच्या बाहेर असलेल्या उड्डाणपुलावर जातानाच या खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती ‘चकाचक दादर’ सामाजिक संस्थेचे संस्थापक चेतन कांबळे यांनी सांगितले. दादर, प्रभादेवी, वरळी भागातील काही रस्त्यांवर तीच स्थिती असून त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले. मालाड पश्चिममधील मार्वे रोड येथील मीठ चौकी सिग्नल जवळील रस्त्याची स्थिती प्रचंड खराब असून खड्डे पडले आहेत. डांबर आणि खडी इतस्तत: पसरली असून यातून वाट काढताना वाहनाचा वेग मंदावत असल्याचे ‘फाइट फॉर राइट फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी सांगितले. साधारण एक महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा काही भाग फिल्मसिटी रोड येथूनही जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटी रोड येथेही खड्डे पडल्याची माहिती साद प्रतिसाद संस्थेचे सचिव संदिप सावंत यांनी दिली.

समाजमाध्यमांवर तक्रारी
रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात मुंबईकरांनी एक्स या समाजमाध्यमातून तक्रारी केल्या. वांद्रे पश्चिम हिल रोड ग्लोबस सिग्नल जवळ, कुर्ला पश्चिम सहार एअरपोर्ट जरीमरी कब्रस्तानजवळील रस्ता याशिवाय एस वॉर्ड, एम पूर्व वॉर्डमधील रस्त्यावरील खड्डेसंदर्भातही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मान्सूनची सुरुवात झालेली असतानाच मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

Maharashtra TimesMumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
खड्डे बुजवण्यासाठी ६० कोटी
खड्ड्यांची समस्या सातत्याने डोके वर काढत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर नुकतेच ताशेरे ओढले होते. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या आधी, पावसाळ्यात आणि त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदाही पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग आणि परिमंडळ १ ते ७ मधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. यासाठी १६ प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत नुकतेच मंजूर करण्यात आले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा