Mumbai Rain: अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात खड्डे बुजवताना तात्पुरता मुलामा म्हणून नुसतेच डांबरीकरण किंवा डांबर आणि खडी यांचे मिश्रण असलेले मास्टिक वापरले जाते.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होतात. महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते.
Navnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
यंदा महापालिकेने परिमंडळ १ ते ७ मधील रस्त्यांवरील खड्डे आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीच्या कामांचे १६ प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले आणि ते मंजूरही झाले. काँक्रीटीकरणामुळे खड्डे बुजवण्याचा खर्च कमी झाल्याचा दावाही मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र हा दावा करतानाच कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबईतील अनेक भागांत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यावरील काही खड्डे हे नुसते डांबरीकरण करून किंवा डांबर-खडीचे मिश्रण वापरून खड्डे बुजवणारी मास्टिक यंत्रणा वापरण्यात आली. मात्र पावसाळा सुरू होताच अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. लहान मोठ्या आकाराच्या खड्ड्यांतून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Mumbai Rain : मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?
दादर पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर पडल्यानंतर सेनापती बापट मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. स्थानकाच्या बाहेर असलेल्या उड्डाणपुलावर जातानाच या खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती ‘चकाचक दादर’ सामाजिक संस्थेचे संस्थापक चेतन कांबळे यांनी सांगितले. दादर, प्रभादेवी, वरळी भागातील काही रस्त्यांवर तीच स्थिती असून त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले. मालाड पश्चिममधील मार्वे रोड येथील मीठ चौकी सिग्नल जवळील रस्त्याची स्थिती प्रचंड खराब असून खड्डे पडले आहेत. डांबर आणि खडी इतस्तत: पसरली असून यातून वाट काढताना वाहनाचा वेग मंदावत असल्याचे ‘फाइट फॉर राइट फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी सांगितले. साधारण एक महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा काही भाग फिल्मसिटी रोड येथूनही जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटी रोड येथेही खड्डे पडल्याची माहिती साद प्रतिसाद संस्थेचे सचिव संदिप सावंत यांनी दिली.
समाजमाध्यमांवर तक्रारी
रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात मुंबईकरांनी एक्स या समाजमाध्यमातून तक्रारी केल्या. वांद्रे पश्चिम हिल रोड ग्लोबस सिग्नल जवळ, कुर्ला पश्चिम सहार एअरपोर्ट जरीमरी कब्रस्तानजवळील रस्ता याशिवाय एस वॉर्ड, एम पूर्व वॉर्डमधील रस्त्यावरील खड्डेसंदर्भातही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मान्सूनची सुरुवात झालेली असतानाच मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
Mumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
खड्डे बुजवण्यासाठी ६० कोटी
खड्ड्यांची समस्या सातत्याने डोके वर काढत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर नुकतेच ताशेरे ओढले होते. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या आधी, पावसाळ्यात आणि त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदाही पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग आणि परिमंडळ १ ते ७ मधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. यासाठी १६ प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत नुकतेच मंजूर करण्यात आले.

