Mumbai police cyber crime exposed how is your bank account being looted; तुमचं बँक खातं कसं लुटलं जातंय? मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली महत्त्वाची माहिती
Mumbai police cyber crime exposed how is your bank account being looted; तुमचं बँक खातं कसं लुटलं जातंय? मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली महत्त्वाची माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सायबर गुन्ह्यांमध्ये वापरली जाणारी बनावट बँक खाती आणि सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळ्यांची गुन्हेपद्धत मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. सायबर लुटीची रक्कम बनावट खात्यांत जमा होताच काही मिनिटांत ती काढून खाती रिकामी केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुंबई सायबर पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने अशा दोन स्वतंत्र टोळ्यांवर कारवाई केली आहे.
मध्य विभाग सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मिरा रोड येथील सलमान पठाण टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने मिरा रोड आणि भाईंदर येथे कार्यालये थाटली होती. या कार्यालयांच्या पत्त्यांवर वेगवेगळ्या नावांनी कंपन्या दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली होती. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांत जमा केली जात होती. एखाद्या खात्यात पैसे जमा होताच ते काही मिनिटांत काढले जात. सलमान पठाण याला बँकेबाहेर सापळा रचून पकडण्यात आले. खात्यातून दहा लाख रुपये काढल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी टोळीकडून अनेक सिमकार्ड, वेगवेगळ्या नावांनी उघडलेल्या बँक खात्यांची चेकबुक, डेबिट कार्ड, मोबाइल फोन, कंपन्यांच्या नावाचे शिक्के आणि बँक खाती सुरू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जप्त केली.
मुंबई गुन्हे शाखेनेही अशाच स्वरूपाच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा माग काढला आहे. ही टोळी सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगसाठी बँक खाती व सिमकार्ड पुरवत होती. या टोळीकडून १५ लॅपटॉप, १२८ एटीएम कार्ड, ८५ मोबाइल, ७६ सिमकार्ड, २२ चेकबुक आणि ७७ पासबुक जप्त करण्यात आली. या टोळीचे मुख्य सूत्रधार दुबईत असून तेथून संपूर्ण कारभार चालविला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बँक खाती आणि सिमकार्ड पुरविणे तसेच सायबर गुन्ह्यांतील रक्कम काढून देण्यासाठी या टोळीला तीन टक्के कमिशन मिळत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा