Headlines

Mumbai Monsoon Issue कुठे प्रसिद्ध डॉक्टरांचा मृत्यू, कुठे विजेचा धक्का अन् आज नाल्यात पडून अंत, मुंबईच्या नाल्यांनी अनेकांचा जीव घेतलाय


मुंबईच्या साकीनाका परिसरात एक व्यक्ती नालेसफाईसाठी उघड्या ठेवलेल्या गटारात पडून वाहून गेली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मुसळधार पावसातही ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याने त्याचा तोल जाऊन ती व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली असा दावा करण्यात येत असला तरी यामुळे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष आणि मॅनहोल आणि नालेसफाईच्या प्रश्नाचं गांभीर्य या दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर वाहून गेलेली व्यक्ती शोधण्यात अपयश आले असून वाहत्या पाण्याचा प्रवाह त्या व्यक्तीला नेमका कुठे घेऊन गेला याचा नेमका अंदाज बांधणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

सुक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

खैराणी रोडवर घडलेल्या या घटनेत नियमांना डावलून 25 फूट खोल असणाऱ्या या मॅनहोलला उघडे ठेवल्यामुळे संबंधित व्यक्तीचा तोल गेला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांची सुरक्षितता आणि प्रशासनाचं दुर्लक्ष या बाबी अधोरेखित झाल्या आहेत. या घटनेत दोषी ठरवून संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं असलं तरी नागरिकांच्या सुक्षिततेचा हा  मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महापौरांसमोरच अधिकारी मॅनहोलमध्ये पडले.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी माटुंगा परिसरात गेल्या होत्या. पाहणी करताना अचानक त्यांच्यासोबत असणारे मुंबई महापालिकेचे अधिकारी अचानक मॅनहोलमध्ये पडले. या घटनेची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

यापूर्वीच्या घटना

यापूर्वीही पावसाळ्यात मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यातल्या काही  घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी घडली नाही तर काही घटनांमध्ये मात्र अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा काही घटनांचा हा आढावा.

दहिसरची  ताजी घटना

दहिसर परिसरात ३० जून रोजी एक व्यक्ती पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे मॅनहोलमध्ये पडली आणि वाहून जाऊ लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला जीवदान दिलं. ही मदत वेळेत  मिळाली नसती तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीही घडू शकलं असतं. 

स्कूल बसवर कोसळले झाड… 

महानगरी मुंबईत तुंबणारे नाले आणि रस्ते यांच्यासोबत पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचा प्रश्नही गंभीर आहे. मान्सूनपूर्व तयारीत झाडांची सद्यस्थिती आणि त्यांच्या कोसळण्याच्या शक्यतेचाही अभ्यास करणे अपेक्षित असते पण याही कामात म्हणावे तसे समाधान दिसत नसल्याची चर्चा आहे. चेंबूर येथे स्कूल बसवर कोसळलेल्या झाडामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. पालिका प्रशासनाने इथेही घटनेनंतर तत्परता दाखवली. या घटनेत ४ विद्यार्थी जखमी झाले.

जूहू येथे नाल्यात पडून मृत्यू

पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या घटना घडल्या त्यामध्ये जूह परिसरातील तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनुसार अंधेरी पश्चिम येथील जुहू परिसरातील नाल्यात २८ जून रोजी निहाल नाझिम मिर्झा (२४) हा तरुण पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाच्या पाण्यात वीजप्रवाह पसरला

नवी मुंबईत (Navi mumbai) पावसाच्या पाण्यातून मार्ग काढत असताना दोन मुलींना वीजेचा धक्का बसल्याने रस्त्यावरच भयानक दृश्य पाहायला मिळालं. सुदैवाने एका धाडसी व्यक्तीच्या प्रसंगावधानतेमुळे दोन्ही मुलीचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

 नेरूळ एल.पी. ब्रिजखाली भूमी अंतर्गत असलेली विद्युत वहिनी उघड्यावर पडली होती. अनेक वाहनाची त्यावरून ये जा झाल्याने त्या वायरवरील कोटिंग निघून गेले असल्याने उघड्या पडलेल्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. दरम्यान, तेथून जाणाऱ्या 16 ते 20 वर्षांच्या दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या (विद्यूत प्रवाहाच्या) संपर्कात आल्या. विजेच्या धक्याने दोघीही पाण्यात पडल्या होत्या, मान्सूनपूर्व तयारी करताना विद्युत विभागाशी संबंधित हे दुर्लक्ष तरुणींच्या जीवावर आले होते. सुदैवाने दोन्ही तरुणी वाचल्या.

वसईत डोळ्यांसमोर वाहने वाहून गेली

वसईतील वाघराळ पाडा परिसरात घडलेल्या एका घटनेत वाहने पाण्याच्या प्रवाहात दिसेनाशी झाली. नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे पार्किंगमध्ये उभी असलेली तीन दुचाकी, एक वॅगनआर कार आणि मारुती कंपनीची एक इको कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. 

 

डॉ. अमरापूरकरांची आठवण

 २०१७ मध्ये ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीच्या दिवशी हिंदमाता परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनावर प्रचंड टीका झाली होती. अमरापूरकर यांच्यासारख्या डॉक्टरांचा यापद्धतीने मृत्यू व्हावा ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. 

डॉ.दीपक अमरापूरकर

यांसारख्या अनेक घटनांमधून बोध घेऊन मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व नालेसफाई आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांचा अभ्यास करणे आणि खबरदारी करणे गरजेचे आहे. मुंबईची तुंबई होण्याचा मुद्दा अनेकदा ऐरणीवर येतो आणि तो

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत