Mumbai Kanjurmarg Carshed Land Acquisition Stop Metro 6 Work in Final Stage; मेट्रो-6चे काम अंतिम टप्प्यात, अद्याप मुंबईतील कांजुरमार्ग कारशेडचा तिढा सुटेना, जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती; कारण काय?
Mumbai Kanjurmarg Carshed Land Acquisition Stop Metro 6 Work in Final Stage; मेट्रो-6चे काम अंतिम टप्प्यात, अद्याप मुंबईतील कांजुरमार्ग कारशेडचा तिढा सुटेना, जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती; कारण काय?
Mumbai Kanjurmarg Carshed : १५ किलोमीटरचा मेट्रो-६ मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील प्रवास वेगवान होईल. त्यातून जोगेश्वरी, गोरेगाव, पवई, विक्रोळीच्या प्रवाशांना पूर्व-पश्चिम प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.
कांजुरमार्ग कारशेड भूसंपादन रखडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
महेश चेमटे, मुंबई : पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी थेट जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मेट्रो प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग कारशेडसाठी केंद्र सरकारच्या स्तरावर भूसंपादन रखडल्याने मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरही ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०२३ रोजी सुमारे १५ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली. या निर्णयाला केंद्र सरकारच्या मिठागर (सॉल्ट पॅन) विभागाने न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामाला मोठा धक्का बसला. आता संबंधित याचिका मागे घेण्यात आली असली, तरी जमिनीच्या वापरबदलाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. Pratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मेट्रो गाड्या ठेवणे, त्यांची देखभाल करणे आणि नियमित तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कारशेडचा अभाव ही मेट्रो मार्ग-६ची सर्वांत मोठी अडचण आहे. कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न वेळेत सुटला असता तर मेट्रोच्या अंतिम चाचण्या आणि नियमित संचालनाच्या तयारीला अधिक वेग आला असता. कारशेडचा प्रश्न आणि अन्य प्रशासकीय, तांत्रिक कारणांमुळे मेट्रो ६चे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. सध्याच्या नियोजनानुसार मेट्रो-६ मार्गिका सन २०२७ मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जून २०२६मधील अहवालानुसार प्रकल्पाची सुमारे ८८ टक्के प्रगती झाली आहे. सन २०२७ चे लक्ष्य गाठताना कारशेडसह जागेची अडचण दूर करणे अत्यावश्यक आहे. Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवात नव्या गाडीचा श्रीगणेशा, कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?
वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले?
कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न सुटेपर्यंत मेट्रो-६चे काम थांबवण्याऐवजी ‘एमएमआरडीए’ने पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. पुणे मेट्रोच्या धर्तीवर कांजुरमार्ग येथे व्हायाडक्टवरच स्टॅब्लिंग लाइन, कोच वॉशिंग प्लान्ट, इन्स्पेक्शन पिट आणि वर्कशॉप यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कारशेडची जमीन मिळण्यास विलंब झाला, तरी मेट्रो मार्ग-६ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा