Headlines

Mumbai Highcourt on Doctor Strike | ॲलोपॅथी-होमिओपॅथी डॉक्टर आमनेसामने, संपावर हायकोर्टाचा कडक इशारा – mumbai high court directs doctors to immediately call off their strike


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकीकडे आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे ॲलोपॅथी डॉक्टर (MBBS/MD), तर दुसरीकडे ‘सीसीएमपी’ (CCMP) म्हणजेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकोलॉजी पूर्ण केलेले होमिओपॅथी (BHMS) डॉक्टर आमनेसामने आले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), सेंट्रल मार्ड (MARD) आणि इतर अनेक वैद्यकीय संघटनांनी राज्यात सध्या तीव्र आंदोलन छेडलं. आपत्कालीन सेवांसह सर्व वैद्यकीय सेवा बेमुदत बंद करण्याचा कडक इशारा दिला होता. मात्र, या संपाची मुंबई उच्च न्यायालयाने थेट ‘सुओ मोटो’ दखल घेत डॉक्टरांना आणि राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले आहे. नक्की काय आहे हा संपूर्ण वाद? होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्यावर ॲलोपॅथी डॉक्टरांचा आक्षेप का आहे? आणि हायकोर्टात काय घडले? हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत