Headlines

Mumbai high court significant relief to nitin gadkari orders removal of objectionable posts about e 20; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा


रमेश खोकराळे, मुंबई : ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील त्या पोस्ट्स अत्यंत घृणास्पद, अश्लील व शिवराळ भाषेतील आहते. कोणी तरी अक्षरश: विष ओकत आहे’, अशी गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने बुधवारी केली. तसेच गडकरी यांच्याविरोधातील सर्व आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्याचा अंतरिम आदेश न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने मेटा, एक्स कॉर्प आणि गुगल एलएलसी यांना दिला.

‘तुमच्याकडे एवढे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मग अशा प्रकारच्या मजकुराची माहिती मिळताच तो ओळखून तातडीने हटवण्याची काही यंत्रणा तुमच्याकडे नाही का? कोणी काहीही अश्लील किंवा शिवराळ मजकूर पोस्ट केला तर तो तातडीने ओळखून हटवला गेला पाहिजे. अशा आक्षेपार्ह पोस्ट्स तुम्ही स्वत:हून तात्काळ हटवायला हव्या. या पोस्ट्स प्रथमदर्शनी अत्यंत घृणास्पद व अश्लील स्वरुपातील आहेत. कोणी तरी अक्षरशः विष ओकत आहे. अशा पोस्ट सर्वांना, विशेषतः तरुण पिढीला सहज उपलब्ध होतील अशा ऑनलाइन व्यासपीठांवर असता कामा नयेत’, असे मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ऑनलाइन मंचांना आदेश देताना नमूद केले.

‘भविष्यात डीपफेक किंवा कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून तयार केलेला कंटेन्ट समाविष्ट असलेले अशाच प्रकारचे पोस्ट्स आढळल्यास गडकरी ऑनलाइन व्यासपीठांकडे तक्रार करू शकतात आणि त्यानंतर संबंधित व्यासपीठांनी त्यावर कारवाई करावी’, असेही न्यायमूर्तींनी आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट केले. ‘भविष्यात संबंधित व्यक्तीला न्यायालयात येण्याची गरज पडू नये आणि ऑनलाइन मंचांनी स्वतःहून अशा आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई करून ती हटवावी, यासाठी काही यंत्रणा असणे आवश्यक आहे’, असे मतही न्यायमूर्तींनी नोंदवले. अखेरीस, गडकरी यांनी दाखल केलेला दावा व अर्जावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवून न्यायालयाने तोपर्यंत प्रतिवादी कंपन्यांना आपले उत्तर प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचे निर्देश दिले.

काय आहे प्रकरण?

इथेनॉलमिश्रित इंधनाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांच्याविरोधात अनेक बनावट, एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या आणि बदनामीकारक पोस्ट ऑनलाइन प्रसिद्ध झाल्या. त्या माध्यमातून या उपक्रमासाठी गडकरी वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचे चित्र उभे करण्यात आले. एआयच्या मदतीने डीपफेकच्या माध्यमातून कंटेन्ट तयार करून तो प्रसारित करण्यात आला आणि गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या उपक्रमातून आर्थिक फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारांनी आपल्या प्रतिष्ठेची व प्रतिमेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, असे म्हणत गडकरी यांनी जुलै महिन्याच्या अखेरीस मेटा, एक्स कॉर्प, गुगल एलएलसी तसेच अज्ञात व्यक्तींविरोधात ११ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. त्यातच एक अर्ज करून सर्व पोस्ट्स हटवण्याचा आदेश देण्याच्या विनंतीचा अर्जही केला. त्या अर्जावरील सुनावणीनंतर न्या. डॉक्टर यांनी हा अंतरिम आदेश दिला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत