Headlines

Mumbai do you want to make citizens slaves for opposing government high court rebukes police order for deportation; जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही! हायकोर्टाने फटकारलं


Mumbai Police News: सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकावर तडीपारीची कारवाई केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

mumbai high court
जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही!(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: केंद्र सरकारविरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला तडीपार केले होते. पोलिसांच्या या कारवाईविरोधात सदर कार्यकर्त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने पोलीस आणि सरकारला कडक शब्दांत फटकारलं आहे. “सरकारचा निषेध करण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे ‘भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे एखाद्याच्या तडीपारीचं कारण ठरू शकत नाही,” असं म्हणत न्यायमूर्ती माधव जामदार यांनी याचिकाकर्त्याच्या तडीपारीचे आदेश रद्द केले आहेत. तसंच पोलिसांना दंड ठोठावण्याचा इशाराही न्यायमूर्तींनी दिला आहे.

नागरिकत्व कायद्यातील सुधारणेसह विविध मुद्द्यांवरून ‘सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी हे केंद्र सरकारविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून चौधरी यांच्याविरोधात तडीपारीचा आदेश काढण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात चौधरी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान काल मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत.

जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? कोर्टाचा सवाल

सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “फक्त सरकारच्या निर्णयांना विरोध केला, हे एखाद्या नागरिकाला तडीपार करण्यासाठीचं कारण ठरू शकत नाही. असं केल्यामुळे नागरिकांच्या भाषणस्वातंत्र्याच्या व सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. हे सगळं काय सुरू आहे? तुम्हाला जनतेला सरकारचं गुलाम बनवायचं आहे का? नागरिकांनी सरकारचा निषेध केला तर तुम्ही गुन्हे दाखल करता. याचिकाकर्त्याने केवळ ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या असून नागरिक आता अशा घोषणाही देऊ शकत नाहीत का? अशा घोषणांसाठी तडीपारीचे आदेश का देण्यात आले?” असे सवाल उपस्थित करत न्यायालयाने सईद यांच्याविरोधातील तडीपारीची नोटीस रद्द करून त्यांची याचिका निकाली काढली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा