Headlines

Mumbai Chembur Puppy Assualt Case Accused Absconding Owner Diya Patel; आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी


Mumbai Puppy Assualt Case : श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार करुन त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यामध्ये ते पिल्लू गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Puppy Assualt Case
चेंबूर श्वानाच्या पिल्लावर अत्याचार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
तन्वी गोलांडे, सीसीआर, मुंबई : मुंबईमधील चेंबूर येथील डोंगरे पार्क परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या ‘किट्टू’ नावाच्या कुत्र्याच्या पिल्लावर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसात गंभीर जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या या पिल्लाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा मानवी क्रूरतेचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला असून, या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

छाती आणि पोटातील पडदा फाटला

प्राथमिक तपासणीदरम्यान, डॉक्टरांना किट्टूच्या छाती आणि पोटातील पडदा फाटल्याचं (डायफ्रॅमॅटिक हर्निया) तसेच शरीरातील अनेक हाडं मोडल्याचं (मल्टीपल फ्रॅक्चर) आढळून आले आहेत. सध्या त्या प्राण्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर ‘नेचर अलाई फाउंडेशन’च्या वैद्यकीय टीमच्या विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. 50 टक्केच जगण्याची शाश्वती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. निष्पाप प्राण्यावर असा भीषण अत्याचार करणाऱ्या अज्ञात दोषीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.
Maharashtra TimesDilip Walse Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

पैशांची टंचाई

किट्टूची मालकीण दिया पटेल आणि स्थानिक प्राणीप्रेमी तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, तिच्या शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील महागड्या उपचारांसाठी 35 हजार रुपयांची मोठी टंचाई भासत आहे. ‘किट्टूचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तिला पुन्हा नवे आयुष्य मिळावे यासाठी नागरिकांनी पुढे येऊन शक्य ती आर्थिक मदत करावी,’ असं भावूक आवाहन दिया पटेल यांनी केलं आहे.

फेरचौकशी कागदावरच!

चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशाला मुंबई महापालिकेनं हरताळ फासला आहे. फेरचौकशीसाठी महापालिकेने कोणत्याही प्रकारची त्रयस्थ संस्था नियुक्त केलेली नाही. महापालिकेच्या या चालढकलीवर शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबत महापालिका वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली आहे.
Maharashtra Timesसावधान! घशात अडकलेला माशाचा काटा ठरू शकतो जीवघेणा; कोणती काळजी घ्याल? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी मुंबई महापालिकेनं प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर 16 जुलैला महापालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून चर्चा घडवून आणली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा